वाढता धोका: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण, काल डेहराडूनमध्ये विना मास्क घेतली होती सभा


Advertisement

नवी दिल्ली16 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोना झाला आहे. केजरीवाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. संसर्ग झाल्याची माहिती मिळताच त्यांनी स्वतःला क्वारंटाइन केले आहे. अरविंद केजरीवाल पंजाब आणि उत्तराखंडमध्ये आम आदमी पक्षाचा प्रचार करत आहेत. सोमवारी केजरीवाल यांनी डेहराडूनमध्ये सभा घेतली होती. यादरम्यान त्यांनी मास्क घातला नव्हता.

Advertisement

केजरीवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, त्यांना संक्रमणाचे सौम्य लक्षण आहेत आणि सध्या ते घरीच क्वारंटाइन झाले आहेत. केजरीवा यांनी आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे.

‘अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटले की, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सौम्य लक्षणं आहेत. स्वत:ला घरातच विलगीकरणात ठेवले आहे. गेल्या काही दिवसांत जे माझ्या संपर्कात आले, त्यांनीही कृपया स्वतःला विलगीकरणात ठेवा आणि स्वतःची चाचणी करून घ्या.’

Advertisement

दिल्लीमध्ये सोमवारी कोरोनाची 4,099 नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. रविवारच्या तुलनेत 28 टक्क्यांनी जास्त कोरोना रुग्ण सापडले आहेत. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोविड-19 मुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. संसर्गाचं प्रमाण 6.46 टक्क्यांवर पोहोचले आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement