औरंगाबाद8 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
वाडा-गढी हलत नसली, तरी त्यातली माणसे हलतात, असे म्हणत संभाजी पाटील निलंगेकर यांनी बुधवारी अमित देशमुख यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. ते औरंगाबादमध्ये आले असता बोलत होते.
गेल्या काही दिवसांपासून माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याबद्दल चर्चा सुरू आहे. त्यावर अमित देशमुख यांनी देशमुख गढी हलत नसल्याचे म्हटले होते. त्यावर त्यावर आज संभाजी पाटील यांनी खोचक उत्तर दिले.
देशमुख म्हणतात…
काँग्रेसमधून आम्ही देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहेत. खुद्द संभाजी पाटील – निलंगेकर यांनी देखील देशमुख यांच्या प्रवेशाला काही दिवसापूर्वी विरोध देखील केला होता. त्यानंतर अमित देशमुख यांनी वाडा गढी, गढ हलत नसतात असे सांगत ते कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
पाटील म्हणतात…
संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, की राज्याच्या राजकारणामध्ये अनेक गड तसेच वाडे यांच्यातली माणसं हलून इतर पक्षात गेली आहेत. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात हे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. अमित देशमुख केवळ कार्यकर्त्यांमध्ये संभ्र निर्माण करत आहेत. त्या माध्यमातून आपली राजकीय सोय ते साधत आहेत. मात्र, त्यांनी असा संभ्रम निर्माण करू नये एक तर उंबरठा ओलांडून अलीकडे यावे अथवा जिथे आहे तिथेच राहावे असा सल्ला त्यांनी देशमुख यांना दिला आहे.
आता अॅडजेस्टमेंट नाही
संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, गेल्या विधानसभा निवडणुकीत धीरज देशमुख यांच्याबाबत अमित देशमुख यांनी शिवसेनेसोबत अॅडजेस्टमेंट केल्याची चर्चा सुरू होती. त्यावेळी संभाजी पाटील निलंगेकर यांनी देखील शिवसेनेसोबत अॅडजेस्टमेंट केल्याचा आरोप केला होता. याबाबत विचारले असता लोक आता हुशार झाले आहेत. देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत अॅडजेस्टमेंट केली होती. मात्र, आता हे चालणार नाही, असा इशारा दिला.