वाचाळविरांना आवरा, सातत्याने सांगतोय: मंत्री लोढांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी ठणकावले, म्हणाले – भाजमध्ये चुका करण्याची स्पर्धा लागली


मुंबई23 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

वाचाळविरांना आवरा हे मी सातत्याने सांगत आहे. एखाद्याला ठेच लागली तर दुसरा, ठेच लागू नये म्हणून प्रयत्न करतो. परंतु भाजपच्या लोकांत चूका करण्याची स्पर्धा लागली आहे अशी प्रखर टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर करीत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवराय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टीकेवरही समाचार घेतला आहे.

Advertisement

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर वादंग अद्याप सुरू असतानाच भाजपचे मंत्री मंगलप्रसाद लोढा यांच्या वक्तव्याने वाद पेटला आहे.

किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अन्य नेते तसेच पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. तेव्हा बोलताना मंगलप्रभात लोढा यांनी तुलनात्मक वक्तव्य केले. यानंतर अजित पवार यांनी आपली रोखठोक भूमिका स्पष्ट करुन भाजपला चांगलेच ठणकावले.

Advertisement

भान राखा

अजित पवार म्हणाले, वाचाळविरांना आवरा हे सातत्याने सांगत आहे. एखाद्याला ठेच लागली तर दुसरा, ठेच लागू नये म्हणून प्रयत्न करतो. परंतु, यांच्यात चूका करण्याची स्पर्धा लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासमोर ही तुलना करण्यात आली. पण, आपल्यावर जबाबदारी काय आहे, कोणाची तुलना करतो, कसे वागावे काय बोलावे? याचे भान असायला हवे.

Advertisement

तारतम्य राहीले नाही

अजित पवारांनी लोढांवर टीकास्त्र डागताना म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कोणाची तुलना होऊ शकते का? याचे तारतम्य या लोकांना राहिले नाही.

Advertisement

काय म्हणाले मंगलप्रभात लोढा?

मंत्री लोढा यांनी आज प्रतापगडावर शिवप्रतापदिनी एक वक्तव्य केले. त्यामुळे ते टीकेचे धनी बनले आहेत. ”छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगाजेब बादशहाने आग्र्यात कैद करुन ठेवले होते. पण, शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बादशहाच्या हातावर तुरी देऊन तिथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, एकनाथ शिंदे हे देखील रोखण्याचा प्रयत्न झाला पण ते बाहेर पडले” असे मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement