वागदीतील ग्रामस्थांची पुलाची मागणी: नवापुरात मृत्यूनंतरही मरणयातना; अंत्यसंस्कारासाठी दोर लावून करावी लागते नदीपार

वागदीतील ग्रामस्थांची पुलाची मागणी: नवापुरात मृत्यूनंतरही मरणयातना; अंत्यसंस्कारासाठी दोर लावून करावी लागते नदीपार


नंदूरबार37 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक
  • शासन आदिवासींचा दारी पोहचेल का ?

नवापूर नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील वागदे गावातील आदिवासी बांधवांना अंतिम संस्कार करण्यासाठी नदी नाल्यातून 3-4 फूट खोल नदीतून अंत्यविधी करण्यासाठी जावे लागते. देश स्वतंत्र होऊन 76 वर्ष झाली तरी आदिवासींची हेळसांड मात्र थांबता थांबत नाहीये हे आदिवासीचे दुर्दैव म्हणावे लागेल.

Advertisement

वागदे गावातील ग्रामस्थांना स्मशान भूमित जाण्यासाठी रस्ता नसल्याने नदी नाल्यातून मार्गस्थ व्हावे लागते. समशानभूमीत जाण्यासाठी नाल्यावर छोट्याशा पुलाची मागणी ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षापासून करत आहे परंतु संबंधित प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने आदिवासींनी नाराजी व्यक्त केली आहे. आदिवासी विकास मंत्री यांच्या जिल्ह्यात हा प्रकार समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गावातील धावजी उघड्या नाईक या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने त्याचे प्रेत नदीतून अंतिम संस्कारासाठी नदीच्या पुरातून शनिवारी सकाळी मार्गस्थ होण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे शासन प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.भर पावसाच्या नदीला पूर असताना देखील ग्रामस्थांना 3-4 फूट पाण्यात दोर बांधून अंत्यविधीसाठी स्मशान भूमी गाठावी लागते. मरणानंतर देखील आदिवासींच्या मरणयातना सुरूच आहेत.

Advertisement

नवापूर तालुक्यातील धनराट कोतवाल फळी अशाच पद्धतीने रंगावली नदी ओलांडून अंत्यविधी करावी लागते त्याचीच पुनरावृत्ती आज नवापूर तालुक्यातील वागदे गावात दिसून आली. कोतवाल फळीतील समस्याला तीन वर्ष झाले तरी देखील उपाय योजना न झाल्याने परिस्थिती जैसे थे आहे.

नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागात सोयी सुविधांच्या अभाव आणि त्यांच्या उडालेला बोजवारा पुन्हा एकदा उघड झाला आहे. धोकादायक पाण्याचा प्रवाहातून हा मृत्यूदेह दुसरे बाजूला नेला जातो व्हिडिओ नवापूर तालुक्यातील वागदे गावातून समोर आला आहे मागील वीस वर्षापासून स्थानिक नागरिक फरशी पुलची मागणी करत आहेत परंतु कोणीही त्यांच्यावर लक्ष द्यायला तयार नाही असा आरोप येथील ग्रामस्थांनी सोशल मीडिया द्वारा केला आहे अंतिम संस्कार करण्यासाठी व जाण्यासाठी मोठी अडचणीचा सामना येथील ग्रामस्थांना पावसाच्या दिवसात करावा लागतो, या कारभारावर स्थानिक ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

AdvertisementSource link

Advertisement