मुंबई21 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमधील 4 मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. मंदिर महासंघाने शुक्रवारी याबाबत माहिती दिली. गोपाळकृष्ण मंदिर (धंतोली), संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिर (बेलोरी-सावनेर), बृहस्पती मंदिर (कनोलीबारा) आणि हिलटॉप दुर्गामाता मंदिर (मानवतानगर) या मंदिरांमध्ये यापुढे आक्षेपार्ह कपडे परिधान करून आल्यास प्रवेश दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
मंदिरांचे पावित्र्य जपण्याचा उद्देश
महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी सांगितले की, मंदिराबाहेर पोस्टरही लावण्यात आले आहेत. ज्यामध्ये फाटक्या जीन्स, स्कर्ट असे आक्षेपार्ह कपडे घालून मंदिरात येऊ नका, असे लिहिले आहे. मंदिरांचे पावित्र्य राखणे हाच आमचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.
यापूर्वीही अनेक मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. ते म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्याची विनंती करणार आहोत.
तुळजा भवानी मंदिरात नियमांच्या अंमलबजावणीवरून वाद
काही दिवसांपूर्वी मे महिन्याच्या सुरुवातीला उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजा भवानी मंदिरातही आक्षेपार्ह कपड्यांवर बंदी घालण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, या निर्णयानंतर वाद सुरू झाला होता. यामुळे काही तासांतच आदेश मागे घ्यावा लागला.
संंबंधित वृत्त
यू-टर्न : तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने तोकड्या कपड्यांचा नियम घेतला मागे, चौफेर टीकेनंतर काही तासांच बदलला निर्णय
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ असणाऱ्या श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात अंगप्रदर्शक कपडे परिधान करून येणाऱ्या भाविकांना प्रवेश बंद करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला होता. पण या निर्णयावर चौफेर टीकेची झोड उठल्यामुळे प्रशासनाने अवघ्या काही तासांतच हा निर्णय मागे घेतला. येथे वाचा संपूर्ण बातमी