वसुलीचा अजब प्रकार: हप्ते थकवलेल्या कर्जदाराची फायनान्स कर्मचाऱ्यांनी नेली दुचाकीवरून दुचाकी, वैजापूरमधील घटना


छत्रपती संभाजीनगर35 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

कर्जवसूलीसाठी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा अजब प्रकार समोर आला आहे. दुचाकीचे हप्ते थकल्याने कर्जवसूलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याची दुचाकी चक्क दुसऱ्या दुचाकीवर टाकून नेल्याची घटना घडली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे ही जगावेगळी वसूली पहायला मिळाली. याबाबतचा व्हीडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Advertisement

नक्की प्रकरण काय?

वैजापूर तालुक्यातील रोटेगाव येथील शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी फायनान्स कंपनीकडून दुचाकीसाठी कर्ज घेतले होते. मात्र, वेळेत हप्त्यांची परतफेड न झाल्याने फायनान्स कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्याच्या घरी गेले. यावेळी थकीत हप्ते भरा नाहीतर दुचाकीची चावी द्या अशी मागणी केली.

Advertisement

शेतकऱ्याने पैसे न दिल्याने कर्मचाऱ्यांनी चावी देण्यास सांगितले. परंतू, शेतकऱ्याने चावी देण्यासही नकार दिला. त्यामुळे या दोन कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याची दुचाकी उचलून थेट सोबत आणलेल्या दुसऱ्या दुचाकीवर टाकली आणि वैजापूर कार्यालयाकडे निघून गेले.

दरम्यान, रस्त्यावर लोकांना दुचाकीवर दुचाकी घेऊन जातानाचा अनोखा प्रकार दिसून आला. अनेकांनी आपल्या मोबाईलमधून दुचाकी घेऊन जाणाऱ्या घटनेचे चित्रीकरण केले. या घटनेनंतर शेतकऱ्याने थकीत रक्कम भरून दुचाकी परतही मिळवली. मात्र, दुचाकी घेऊन जातानाचा व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement