वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव: निसर्गाशी पुन्हा एकदा नाळ जोडणे आवश्यक – वाणी मूर्ती


पुणे8 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

माझ्या कामाच्या प्रवासाची पाने उलटवून पाहिली असता कळत न कळत आपण निसर्गाशी कशा प्रक्रारे अलिप्त होऊन गेलो होतो याची जाणीव होते. परंतू ही जाणीव होताच निसर्गाशी पुन्हा एकदा नाळ जोडली गेली असून संपूर्ण मनुष्य प्राण्यांच्या बाबतीत देखील ही नाळ जोडली जाणे आवश्यक आहे. तरच आपण आपले अस्तित्व या पृथ्वीतलावर राखून ठेवू शकतो. असे मत कंपोस्टिंग आणि बागकाम प्रेमींसाठी प्रेरणादायी ठरलेल्या बेंगळूरू येथील वाणी मूर्ती यांनी शनिवारी व्यक्त केले.

Advertisement

किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लबतर्फे आयोजित 16 व्या ऑनलाइन किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दुसऱ्या दिवशी कंपोस्टिंग तज्ज्ञ, कमी कचरा उत्पन्न करणारी जीवनशैली जगणाऱ्या, तसेच कंपोस्टिंग आणि बागकाम प्रेमींसाठी प्रेरणादायी ठरलेल्या बेंगळूरू येथील वाणी मूर्ती यांना ‘हरित शिक्षक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आरती किर्लोस्कर यांनी मनोगत व्यक्त केले. तर आनंद चितळे यांनी किर्लोस्कर वसुंधराच्या संपूर्ण उपक्रमाविषयी सविस्तर विवेचन केले. वाणी मुर्ती म्हणल्या की, किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लबतर्फे ‘निसर्गाचे संवर्धन, पोषक अन्न आणि सशक्त समाज’ ही मध्यवर्ती संक्ल्पना घेऊन सुरु करण्यात आलेले काम काैतुकास्पद असून योगायोगाने माझेही काम याच मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत आहे, याचा मला आनंद आहे.

निसर्गाशी अलिप्त होण्यापासून ते परत एकदा निसर्गाशी जोडले जाण्याचा माझा हा प्रवास रोमांचकारी होता. हा रोमांचकारी प्रवास प्रत्येक मनुष्याने अनुभवावा असे आवाहन मी या निमित्ताने करते. निसर्गाचे आरोग्य थेट आपल्या आरोग्याशी जोडलेले असून त्याचे आरोग्य बिघडणे म्हणजे आपले आरोग्य बिघड़वण्यासारखे आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement