वसमतमध्ये मोठी कारवाई: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला साडेचार लाख रुपयांचा गुटखा


Advertisement

हिंगोली2 तासांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर

  • कॉपी लिंक

वसमत येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी तारीख 9 पहाटे चार वाजता एका घरावर छापा टाकून साडेचार लाख रुपयांचा गुटका जप्त केला आहे. याप्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत शहरातील शिवनेरी नगर भागात अब्दुल मुखीद याच्या घरामध्ये प्रतिबंधित गुटका साठवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Advertisement

त्यावरून पोलीस अधीक्षक राकेश कलासागर अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदयन खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवसांब घेवारे जमादार संभाजी लेकुळे, भगवान आडे, किशोर कातकडे, प्रशांत वाघमारे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने आज पहाटे चार वाजता अब्दुल मुखीद याच्या घरावर छापा टाकला. मात्र पोलिसांना पाहताच तो घराच्या छतावरून पळून गेला.

पोलिसांनी घरामध्ये शोध घेतला असता गुटख्याची 29 पोती आढळून आली आहेत. यामध्ये विमल, वजीर, गोवा या गुटख्याचा समावेश आहे. या गुटख्याची किंमत साडे चार लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी गुटख्याची सर्व पोते जप्त करून वसमत पोलीस ठाण्यात जमा केले आहेत. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here