वंचितने इंडियाविरोधात उमेदवार देऊ नये!: रोहित पवारांच्या विधानावर आंबेडकर म्हणाले-वंचितांनी नेहमीच उच्चवर्णीयांसाठी बलिदान द्यावं असं वाटतंय का?

वंचितने इंडियाविरोधात उमेदवार देऊ नये!: रोहित पवारांच्या विधानावर आंबेडकर म्हणाले-वंचितांनी नेहमीच उच्चवर्णीयांसाठी बलिदान द्यावं असं वाटतंय का?


मुंबई15 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

आगामी निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीविरोधात उमेदवार देऊ नये, असे विधान राष्ट्रवादीचे आमदार (शरद गट) रोहित पवार यांनी केले. त्यांच्या या विधानाला वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या पुत्राने तसेच वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिले आहे.

Advertisement

सुजात यांनी म्हटले की, इंडिया आघाडी आम्हाला आपल्यात सामावून घेत नसेल तर आम्ही काय करायचं? आम्ही निवडणूकच लढायची नाही का? आम्हाला जो सल्ला दिला जातोय, तोच सल्ला तुम्ही तुमच्या पक्षांना का देत नाही? देशातील वंचितांनी आणि बहुजांनी नेहमीच उच्चवर्णीयांसाठी बलिदान द्यावं असं वाटतंय का? जसं तुम्ही शतकानुशतके करत आला आहात.

28 पक्ष एकत्र ‘इंडिया’ आघाडी स्थापन
भाजपाप्रणित एनडीएविरोधात देशातले 28 विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. या पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या
सरकारविरोधात तयार केलेल्या आघाडीला इंडिया असं नाव दिले आहे. या आघाडीत महाराष्ट्रातले दोन पक्ष सहभागी झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या आघाडीचे सदस्य आहेत.

Advertisement

वंचित, एमआयएमला वंचितचे निमंत्रण नाही
परंतु, देशात काही पक्ष असे आहेत जे एनडीएचे सदस्य नाहीत त्याचबरोबर इंडिया आघाडीचेही सदस्य नाहीत. यापैकी काही पक्ष इंडिया आघाडीत सहभागी होण्यास इच्छूक आहेत. असदुद्दीन ओवैसी यांचा एआयएमआयएम आणि प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हे दोन पक्ष इंडिया आघाडीत सहभागी होण्यास इच्छूक आहेत. परंतु, इंडिया आघाडीने त्यांना आघाडीचं निमंत्रण दिलेलं नाही.

महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये एकवाक्यता का नाही?
एमआयएम आणि वंचितच्या काही नेत्यांनी इंडिया आघाडीने त्यांना सामावून घ्यावं अशी इच्छा अनेकदा व्यक्त केली आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आणि पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे पूत्र सुजात आंबेडकर यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केले आहे. सुजात आंबेडकर यांनी शरद पवार गटातील आमदार रोहित पवारांना प्रश्न विचारला आहे की इंडिया आघाडीच्या महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीला आपल्याबरोबर घेण्याबद्दल एकवाक्यता का नाही?

Advertisement

आमदार रोहित पवार यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना वंचित आघाडीने इंडिया आघाडीच्या उमेदवाराविरोधात उमेदवार उभा करू नये, अशी म्हटले. त्यावर आता सुजात आंबेडकर यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी रोहित पवारांना उद्देशून म्हटलं आहे की भलेही इंडिया आघाडीच्या निर्णय प्रक्रियेत तुम्ही सहभागी नसाल पण, इंडिया आघाडीच्या महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीला घेण्याबद्दल एकवाक्यता का नाही?

जे आधीच मागे आहेत, त्यांनी आणखी किती…
वंचित बहुजन आघाडीने इंडिया आघाडीविरोधात उमेदवार उभा करू नये ही भूमिका घेताना इंडिया आघाडीच्या नेत्यांनी स्वतः वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देऊन मतांची फूट टाळण्याचा प्रयत्न का करू नये? ‘फोडा आणि राज्य करा’ ही भाजपाची निती स्पष्ट असताना वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीपासून दूर ठेवून फूट का पाडली जात आहे? सर्वांनी दोन पावलं मागे घेण्याची गरज असेल, तर जे आधीच मागे आहेत त्यांनी आणखी किती पावलं मागे जायचं?

AdvertisementSource link

Advertisement