लोकेश राहुलचा संघ हरला पण त्याची फलंदाजीने मनं जिंकली;नेतृत्वाबद्दल मात्र प्रश्नचिन्ह

लोकेश राहुलचा संघ हरला पण त्याची फलंदाजीने मनं जिंकली;नेतृत्वाबद्दल मात्र प्रश्नचिन्ह
लोकेश राहुलचा संघ हरला पण त्याची फलंदाजीने मनं जिंकली;नेतृत्वाबद्दल मात्र प्रश्नचिन्ह

यंदाच्या हंगामात लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्सचा प्रवास बुधवारी संपुष्टात आला. प्ले ऑफच्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौचा १४ धावांनी पराभव केला. या पराभवानंतरही राहुलने आयपीएलच्या इतिहासात एक मोठा विक्रम केला. लीगच्या सर्वाधिक ४ हंगामात ६०० किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो पहिलावहिला खेळाडू ठरला. त्याने यादीत विराट कोहली, ख्रिस गेल आणि डेव्हिड वॉर्नरसारख्या दिग्गजांना मागे टाकले.

सर्वाधिक आयपीएल हंगामात ६००+ धावा करणारे खेळाडू-

Advertisement

लोकेश राहुल – ४ वेळा (२०१८, २०२०, २०२१, २०२२)

ख्रिस गेल – ३ वेळा (२०११, २०१२, २०१३)

Advertisement

डेव्हिड वॉर्नर – ३ वेळा (२०१६, २०१७, २०१९)

विराट कोहली – २ वेळा (२०१३ आणि २०१६)

Advertisement

राहुलची संथ खेळी ठरली लखनौच्या पराभवाचे कारण

एलिमिनेटर सामन्यात बंगलोर विरुद्धच्या २०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊ संघाचा कर्णधार लोकेश राहुलने संथ खेळी केली. त्याने ५८ चेंडूत ७९ धावांची खेळी खेळली. त्याचा स्ट्राइक रेट १३६.२१ इतका होता. पण तो स्ट्राईक सामन्याच्या दृष्टीने योग्य नव्हता. राहुलची संथ खेळी लखनौच्या पराभवाचे कारण ठरली. राहुलने आपल्या खेळीत ५ षटकार आणि ३ चौकार लगावले.

Advertisement

आपल्या पहिल्याच हंगामात थेट प्ले ऑफ्समध्ये धडक मारणाऱ्या लखनौ सुपर जायंट्स संघाचा प्रवास एलिमिनेटर सामन्यात संपुष्टात आला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने बुधवारच्या सामन्यात लखनौला १४ धावांनी पराभूत केले. साखळी फेरीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला लखनौचा संघ २००हून अधिक धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चांगल्या लयीत होता. मात्र शेवटच्या तीन षटकांत सामना पूर्णपणे पलटला. लोकेश राहुल आणि दीपक हुड्डा दोघेही बाद झाले आणि लखनौने सामना गमावला. या सामन्यानंतर लखनौ संघाचा मेंटॉर गौतम गंभीर याला हा पराभव फारसा रूचला नाही. सामना हरल्यानंतर गंभीरने कर्णधार लोकेश राहुलला खतरनाक लूक दिला.

गौतम गंभीरने लूक दिल्याचा फोटो चांगलाच व्हायरल झाला. शेवटच्या चार षटकांत लखनौच्या फलंदाजीची झालेली पडझड गौतम गंभीरला रूचली नसल्याचं त्याच्या नजरेतून स्पष्ट दिसलं. त्यामुळे त्याने शब्दांऐवजी नजरेतून लखनौ संघाच्या कामगिरीवर नाराजी दर्शवली. त्याचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला. इतकंच नव्हे तर त्या फोटोवरून भन्नाट मीम्सही सोशल मीडियावर दिसून आले.

दरम्यान, लखनौ विरूद्धच्या सामन्यात बंगलोरने प्रथम फलंदाजी करताना २०७ धावा केल्या. विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, फाफ डू प्लेसिस यांसारख्या बड्या खेळाडूंनी साफ निराशा केल्यानंतर युवा फलंदाज रजत पाटीदारने अप्रतिम फलंदाजी केली. त्याने शतक ठोकत संघाला द्विशतकी मजल मारून दिला. या आव्हानाला प्रत्युत्तर देताना लखनौचा क्विंटन डी कॉक स्वस्तात परतला. लोकेश राहुलने अर्धशतक ठोकलं. त्याला दीपक हुड्डाने दमदार फटकेबाजी करत चांगली साथ दिली. पण अखेरीस त्यांचे प्रयत्न तोकडे पडले.

Advertisement