लेकीला पोलिस भरतीसाठी घेऊन आला बाप: रात्र फुटपाथवर काढली, अन सकाळी रस्ता ओलांडताना ट्रकने चिरडले; पसार ट्रकचालक अटकेत


पुणे5 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

नाशिक येथील 23 वर्षीय एक तरुणी पाेलीस भरतीसाठी पुण्यात आईवडीलांसह नुकतीच आली हाेती. त्यावेळी तरुणी भरतीसाठी गेल्यानंतर तिचे वडील चहा पिण्यासाठी रस्ता ओलांडून जात असताना भरधाव वेगात असलेल्या एका ट्रकने त्यांना धडक देऊन गंभीर जखमी करत त्यांच्या मृत्युस कारणीभूत हाेऊन ट्रकसह चालक पसार झाला हाेता.

Advertisement

शिवाजीनगर पाेलिसांनी याप्रकरणाचा तपास करत अखेर वाघाेली परिसरातून जालन्याच्या ट्रकसह चालकास जेरबंद केले आहे. अंकुश राजेंद्र राख (रा.हाजीपुर, पाे.ब्रम्हागाव, ता.आष्टी, जि.बीड) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. तर सुरेश सखाराम गवळी (वय-५३,रा.नाशिक) असे मयताचे नाव आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 मार्च राेजी सुरेश गवळी हे त्यांची पत्नी व मुलीसह पाेलिस भरतीसाठी शिवाजीनगर मुख्यालय मैदान याठिकाणीआले हाेते. रात्र फुटपाथवर काढल्यानंतर सकाळी मुलगी पाेलिस भरतीसाठी गेली हाेती. त्यावेळी तिचे वडील सुरेश गवळी हे रस्ता ओलांडत असताना, अनाेळखी ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून गवळी यांना धडक देऊन गंभीर जखमी केले. आणि त्यांना रुग्णालयात न नेता तो पसार झाला.

Advertisement

गुन्हा घडल्यानंतर वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांनी शिवाजीनगर पाेलिसांना गुन्हा उघडकीस आणण्याचे सूचना केल्या हाेत्या. त्यानुसार, सदर दाखल गुन्हयातील अज्ञात वाहनाचा व वाहनचालकाचा सहा.पाेलीस निरीक्षक भाेलेनाथ अहिवळे यांचे पथक तपास करताना, त्यांनी पाेलीस हवालदार रणजीत फडतरे यांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन गुन्हयातील अनाेळखी वाहनाची माहिती प्राप्त केली.

यात सदरचा ट्रक हा बाबा राेडवेज, जालना येथील टाटा कंपनीचा (एमएच 21 बीएच 3369) असल्याचे निष्पन्न झाले. सदर ट्रकचा चालक जालना येथून गुरवारी नगरराेडने वाघाेली येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यावर, पाेलिसांनी वाघाेली परिसरात सापळा रचला. त्यानुसार संबंधित ट्रक वाघाेली परिसरात वजन काटयावर आल्याचे दिसताच, पाेलीसांनी सदर वाहन चालक अंकुश राख यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली आहे.

Advertisement

सदरची कामगिरी पश्चिम प्रादेशिक विभागचे अपर पाेलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, परिमंडळ एकचे पाेलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, विश्रामबाग पाेलीस ठाण्याचे सहा.पाेलिस आयुक्त गजानन टाेम्पे यांचे मार्दशर्नाखाली वरिष्ठ पाेलिस निरीक्षक अरविंद माने, सपाेनि भाेलेनाथ अहिवळे, पीएसआय अर्जुन नाईकवडे, विशाल शिंदे, पाेलिस अंमलदार रणजित फडतरे, अतुल साठे, बशीर सय्यद, शिवा कांबळे, प्रविण राजपूत, अविनाश भिवरे, गणपत वाळकाेळी यांनी केली आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement