लिव्हिंगस्टोनची गोलंदाजी पाहून वसीम जाफरला गुरमीत राम रहीम सिंगची आठवण का आली, शेअर करा मजेशीर मीम

लिव्हिंगस्टोनची गोलंदाजी पाहून वसीम जाफरला गुरमीत राम रहीम सिंगची आठवण का आली, शेअर करा मजेशीर मीम
लिव्हिंगस्टोनची गोलंदाजी पाहून वसीम जाफरला गुरमीत राम रहीम सिंगची आठवण का आली, शेअर करा मजेशीर मीम

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध, पंजाब किंग्जच्या लियाम लिव्हिंगस्टोनने वॉर्नर आणि पंतला ऑफ स्पिन चेंडूवर तर रोव्हमन पॉवेल लेगस्पिन चेंडूवर बाद केले. त्यानंतर वसीम जाफरने एक मीम शेअर केला आहे. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल २०२२ मध्ये पंजाब किंग्जला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

पंजाब किंग्जकडून लियाम लिव्हिन्स्टोनने शानदार गोलंदाजी केली, ज्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचा संघ २० षटकात ७ गडी गमावून १५९ धावाच करू शकला. लियाम लिव्हिंगस्टोनने चार षटकांत २७ धावांत तीन बळी घेतले. लिव्हिंगस्टोनने या काळात ऑफ आणि लेग स्पिन दोन्ही गोलंदाजी केली आणि विकेट्सही घेतल्या. ऑफ-स्पिनवर त्याने डेव्हिड वॉर्नर आणि ऋषभ पंतला पॅव्हेलियनमध्ये पाठवले, तर लेग-स्पिनवर रोव्हमन पॉवेलची विकेट घेतली.

Advertisement

वॉर्नर गोल्डन डकचा बळी ठरला, तर पंत तीन चेंडूत सात धावा काढून बाद झाला, पॉवेलला सहा चेंडूत केवळ दोन धावा करता आल्या. लिव्हिंगस्टोनची गोलंदाजी पाहून भारताचा माजी कसोटीपटू वसीम जाफरने गुरमीत राम रहीम सिंगची एक मीम शेअर केली. ज्यामध्ये तो म्हणत आहे की तो लेग स्पिन, ऑफ स्पिन, विकेटकीपिंग आणि क्षेत्ररक्षण करू शकतो आणि तो एक संपूर्ण अष्टपैलू खेळाडू आहे. वसीम जाफरचे हे ट्विट खूप व्हायरल होत आहे.

मिचेल मार्श (४८ चेंडूत ६३ धावा) आणि सर्फराज खान (१६ चेंडूत ३२ धावा) यांच्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला १५९ धावांपर्यंत मजल मारता आली. मात्र, प्रत्युत्तरात पंजाब किंग्जचा संघ २० षटकांत ९ गडी गमावून १४२ धावाच करू शकला. पंजाब किंग्ज या वेळेनंतर प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत, तर प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव करावा लागेल.

Advertisement