लिलावात सर्वाधिक किंमत मोजलेला हा खेळाडू आता मुंबई इंडियन्सला होतोय डोईजड, कोण आहे तो वाचा…

लिलावात सर्वाधिक किंमत मोजलेला हा खेळाडू आता मुंबई इंडियन्सला होतोय डोईजड, कोण आहे तो वाचा...
लिलावात सर्वाधिक किंमत मोजलेला हा खेळाडू आता मुंबई इंडियन्सला होतोय डोईजड, कोण आहे तो वाचा...

मुंबई इंडियन्सला सलग आठव्या सामन्यात पारबव पत्करावा लागला. पण या पराभवासाठी सर्वात जास्त जबाबदार ठरला तो इशान किशन. त्यामुळे इशान किशन हा मुंबईसाठी यावेळी व्हिलन ठरल्याचे पाहायला मिळाले. लिलावात सर्वाधिक किंमत मोजलेला हा खेळाडू आता मुंबईला डोईजड होत असल्याचेच समोर येत आहे. आजच्या सामन्यात तर इशानने लाजीरवाणी कामगिरी केल्याचेच पाहायला मिळाले. रोहित शर्माने लखनौविरुद्धच्या सामन्यात चौकारासह भन्नाट सुरुवात केली होती. त्यामुळे मुंबईचा संघ आता सामना जिंकणार, असे वाटत होते. पण मुंबई इंडियन्ससाठी याववेळ व्हिलन ठरला तो इशान किशन. आयपीएलध्ये सर्वात जास्त रक्कम त्याच्यासाठी मोजली गेली, पण यावेळी मात्र इशान हा सपशेल अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. इशानमुळेच यावेळी मुंबईच्या संघाला चांगली सुरुवात मिळू शकली नाही.

इशानने कोणती लाजीरवाणी गोष्ट केली, पाहा…

Advertisement

लखनऊने मुंबईपुढे १६९ धावांचे आव्हान ठेवले होते. वानखेडेच्या मैदानात हे आव्हान नक्कीच मोठे नव्हते. कारण वानखेडेची खेळपट्टी ही नेहमीच फलंदाजीला मदत करणारी असते. पण या खेळपट्टीवर इशान मात्र कसोटी सामना खेळायला आला आहे की का, अशा थाटातच खेळत असल्याचे पाहायला मिळाले. एकिकडे रोहित शर्मा चांगली फटकेबाजी करत होता. रोहितला साथ देणे तर दूरच पण त्याला प्रत्येक चेंडूगणिक एक धाव काढताही येत नव्हती. इशान किशन पहिला पॉवर प्ले खेळला, पण यावेळी त्याच्या बॅटला गंज लागल्याचे वाटत होते. कारण यावेळी तो तब्बल २० चेंडूंत खेळला यामध्ये २० धावा करत दूरच त्याला १० धावा देखील करता आल्या नाहीत. त्यामुळे दमदार खेळ करणाऱ्या रोहित शर्माबरोबर अन्य फलंदाजांवरचे दडपण वाढत गेले आणि त्याची परीणीती ही पराभवात झाली.

इशान किशन हा गेल्या सहा सामन्यांपासून सातत्याने अपयशी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. लखनौविरुद्धच्या सामन्यात तर तो कसोटी सामनाच खेळायला आल्यासारखे वाटत होते. कारण ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये २० चेंडूंत ८ धावा करणे, कोणत्याही फलंदाजाला शोभणारे नाही. यापूर्वीच्या चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात तर इशानला भोपळाही फोडता आला नव्हता. तो शून्यावरच बाद झाला होता. त्यापूर्वी पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात इशानला फक्त तीनच धावा करता आल्या होत्या.

Advertisement

एकंदरीत आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये सातत्यने अपयशी होणाऱ्या फलंदाजांमध्ये इशानचे नाव तर घेतलेच जात आहे. पण लखनौविरुद्धच्या सामन्यात कासवगती खेळी साकारल्यामुळे तो टीकेचा धनीही ठरत आहे. यावर्षी झालेल्या लिलावात आयपीएलमधली सर्वाधिक रक्कम इशानला मिळाली होती. त्यामुळे इशान हे आयपीएल गाजवेल, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण आता तर तो मुंबई इंडियन्ससाठी डोईजड व्हायला लागला आहे. त्याच्यापेक्षा मुंबईच्या संघात यापूर्वी असणारा क्विंटन डीकॉक हा सातत्याने चांगली कामगिरी करत असल्याचे पाहायला मिळत होते. त्यामुळे इशानने या सामन्यात लाजीरवाणी कामगिरी केल्यामुळेच मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला, असे मुंबईचे चाहते म्हणत होते.

Advertisement