लिलावात कोण परफॉर्मन्स देईल हे सांगता येत नाही पण असे नाकारणे महागात पडू शकते हे मिलरने दिले दाखवून

लिलावात कोण परफॉर्मन्स देईल हे सांगता येत नाही पण असे नाकारणे महागात पडू शकते हे मिलरने दिले दाखवून
लिलावात कोण परफॉर्मन्स देईल हे सांगता येत नाही पण असे नाकारणे महागात पडू शकते हे मिलरने दिले दाखवून

इंडियन प्रीमियर लीग १५ च्या मेगा लिलावात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलरला पहिल्या दिवशी कोणीही विकत घेतले नाही. अशा स्थितीत पहिल्या दिवशी तो अनसोल्ड राहिला, पण दुसऱ्या दिवशी राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्सने मोठी बोली लावली. आयपीएल २०२२ च्या क्वालिफायर १ मध्ये गुजरात टायटन्ससाठी अंतिम सामन्याचे तिकीट जिंकणारा दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलर याला इंडियन प्रीमियर लीगच्या या हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी कोणताही खरेदीदार मिळाला नाही.

लिलावाच्या पहिल्या दिवशी कोणत्याही संघाने डेव्हिड मिलरमध्ये रस दाखवला नाही. इतकंच नाही तर त्याच्या जुन्या फ्रेंचायझी, राजस्थान रॉयल्सनेही, पहिल्या दिवशी त्याच्यावर बोली लावली नाही.असा परिस्थितीत एक कोटीची मूळ किंमत वाला मिलर पहिल्या दिवशी अनसोल्ड राहिला. तथापि मिलरने कदाचित कल्पना केली असेल की त्याला दुसऱ्या दिवशी मोठ्या रकमेसह खरेदीदार मिळेल. राजस्थान रॉयल्सने दुसऱ्या दिवशी त्याच्यासाठी बोली लावायला सुरुवात केली, पण राजस्थानने किलर मिलरमध्ये रस दाखवताच गुजरातनेही बोली लावायला सुरुवात केली आणि ही बोली ३ कोटींवर पोहोचली.

Advertisement

हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्सने ३ कोटींची शेवटची बोली लावली, पण त्यानंतर राजस्थान रॉयल्सने आणखी बोली लावण्याचा प्रयत्न केला नाही आणि पहिल्या दिवशी न विकला गेलेला डेव्हिड मिलर ३ कोटी रुपयांत गुजरात संघात सामील झाला. गुजरात टायटन्सच्या व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि प्रत्येक सामन्यात त्याला संधी दिली. या प्रसंगी तो खरा ठरला आणि त्याने संघासाठी अनेक सामने जिंकले, ज्यामध्ये सर्वात उल्लेखनीय सामना क्वालिफायर १ ठरला. पहिल्या क्वालिफायर सामन्यात ३८ चेंडूत ६८ धावा करून नाबाद परतला आणि गुजरातच्या गुजयाचा नायक ठरला.

डावखुरा फलंदाज डेव्हिड मिलरने १५ सामन्यांत ४४९ धावा केल्या आहेत आणि या मोसमात गुजरातसाठी सर्वाधिक धावा करणारा तो दुसऱ्या फलंदाज आहे. त्याने या मोसमात ६४ पेक्षा जास्त सरासरी आणि १४१ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. यावेळी त्याने २९ चौकार आणि २२ षटकार मारले आहेत. किलर मिलर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने गुजरातला अनेकवेळा बिकट परिस्थितीतून बाहेर काढण्याचे काम केले आहे.

Advertisement

Advertisement