लावणी सम्रज्ञीच्या पक्ष प्रवेशावर वादंग?: राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष; भाजप नेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया


Advertisement

मुंबईएका तासापूर्वी

  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भापजमध्ये गेल्या काही दिवसापासून शाब्दीक खडाजंगी सुरु आहे. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. पुणेकर या 16 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेत प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Advertisement

दरेकरांनी पक्ष प्रवेशावरुन ‘राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष असल्याचे म्हटले आहे.’ ते आज पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात रामोशी समाजाचा मेळाव्याप्रसंगी बोलत होते. आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ते पुढे म्हणाले की, “हा पक्ष सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष असल्याने गरीबांकडे पाहण्यासाठी वेळ नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here