लाल किल्ल्यावरून शेतकऱ्यांबाबत सरकारचा तोंड देखलेपणा: कांदा निर्यात शुल्कावरुन विरोधी पक्ष नेते अंबदास दानवे आक्रमक

लाल किल्ल्यावरून शेतकऱ्यांबाबत सरकारचा तोंड देखलेपणा: कांदा निर्यात शुल्कावरुन विरोधी पक्ष नेते अंबदास दानवे आक्रमक


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ambadas Danve Onion Farmers Protest Centre’s 40% Duty On Export Government’s Face Towards The Farmers Is Visible

छत्रपती संभाजीनगर5 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

एकीकडे कापसाचे आयात शुल्क कमी करता आणि दुसरीकडे कांद्याचे निर्यात शुल्क वाढवता, म्हणजे हा देश शेतकऱ्यांचा आहे की, कारखानदारांचा आहे, असा प्रश्न पडतो. देशातील केंद्र सरकार हे दुतोंडी आहे. एकीकडे लाल किल्ल्यावरून आणि मुंबईतून शेतकऱ्यांना तोंड देखले पणा करायचा आणि दुसरीकडे आणि शेतकऱ्याचा जीव घेण्याचे काम धोरणाच्या माध्यमातून केले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त त्यांनी वेरुळ येथील घृश्नेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Advertisement

एकेकाळी कांदा पन्नास पैसे किलोच्या दराने विक्री होत होता. त्यावेळी सरकारने शेतकऱ्यांसाठी साडेतीनशे रुपये अनुदान जाहीर केले होते. मात्र, ते अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाही. अशी परिस्थिती असताना आता पुन्हा काद्यावर निर्यात शुल्क लावण्यात आल्याने अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली.

संपूर्ण मराठवाड्यामध्ये जवळपास सर्व ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती आहे. काही ठिकाणी पेरणी झाली आहे तर काही ठिकाणी दुबार पेरणी देखील झाली आहे. एकीकडे शेतकऱ्यांचा अंत सरकार पाहत आहे तर दुसरीकडे निसर्ग देखील शेतकऱ्यांचा अंत पाहत आहे. सरकारने जाहीर केलेले पैसे अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी करायचे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या सर्व परिस्थितीत शेतकरी संघर्ष करत असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

Advertisement

चारा छावण्याचा प्रश्न

चारा छावणी उभारावी अशी स्थिती अद्याप निर्माण झालेली नाही. मात्र, तशी स्थिती निर्माण झाली तर शिवसेना नक्कीच पुढाकार घेऊन चारा छावण्या उभारेल, असा विश्वास अंबादास दानवे यांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

ताकद देण्याची मागणी

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना महाराष्ट्रातच नाही तर देशात मजबुतीने उभी राहील. त्यासाठी आपण घृश्नेश्वराच्या चरणी आम्हाला ताकद देण्याची मागणी आपण केली असल्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले.

Advertisement



Source link

Advertisement