लाचेच्या जाळ्यात: कोपरगावचे तहसीलदार वीस हजार घेताना अटकेत


प्रतिनिधी | कोपरगाव21 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पकडलेल्या वाळू वाहतुकीच्या वाहनांवर कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे आपल्या हस्तकासह नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात शनिवारी अडकला. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील वाळू वाहतूक करणारी वाहने तहसीलदारांच्या पथकाने पकडली होती. सदर वाहनांवर कारवाई न करण्याकरिता आरोपी तहसीलदार विजय जबाजी बोरुडे यांच्याकरिता आरोपी गुरमित सिंग डडियाल (रा. कोपरगाव) याने १७ ते १९ मे दरम्यान २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. यादरम्यान फिर्यादी यांनी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क साधून याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

Advertisement

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचला होता. आरोपी तहसीलदार बोरुडे यांनी नमूद लाचेच्या मागणीस प्रोत्साहन दिले असून लाचेची रक्कम २० हजार रुपये आरोपी डडियाल याला १९ मे रोजी स्वीकारताना पंच साक्षीदारासमक्ष नाशिकच्या लाच प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, याआधी त्याने कुणाला लाच मागितली का ? याचाही तपास सुरू आहे.Source link

Advertisement