लहुजी वस्ताद साळवे स्मारकाचे काम तातडीने सुरू करा: अन्यथा राज्यभर लढा उभारू – माजी मंत्री रमेश बागवेंचा राज्य सरकारला इशारा


पुणे5 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान देणारे,महात्मा फुले ,लोकमान्य टिळक ,वासुदेव बळवंत फडके या महापुरुषासह कित्येक क्रांतिकारक घडवणारे क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम सुरू होत नाही. येत्या अंदाजपत्रकात पुणे महापालिकेने मोठ्या प्रमाणात स्मारकासाठी निधी उपलब्ध करावा अन्यथा राज्यभर मातंग समाजाचा लढा उभारून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा माजी मंत्री व मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक रमेश बागवे यांनी प्रशासनाला व राज्य सरकारला मंगळवारी आंदोलनातून इशारा दिला आहे.

Advertisement

यासह गरीब व वंचित ,घटकातील मुलीसाठी मुक्ता साळवे यांच्या नावे वसतिगृह सुरू करावे यासह मातंग सामजाच्या विविध मागण्या तात्काळ मान्य कराव्या अशी मागणीही त्यांनी केली.

या आंदोलनात मातंग एकता आंदोलनाचे कार्याध्यक्ष माजी नगरसेवक अविनाश बागवे , राष्ट्रवादी मागासवर्गीय सेल शहराध्यक्ष विजय डाकले,शिवसेना नेते बाळासाहेब भांडे ,राज्य समन्वयक विठ्ठल थोरात , सुरेखाताई खंडाळे ,महिला शहराध्यक्ष राजश्री ताई अडसूळ , अंकल सोनवणे ,मधुकर चांदणे ,विनोद शिंदे ,अॅड . एकनाथ सुगावकर यासह पुणे शहरातील महिला युवक व मातंग एकता आंदोलनाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Advertisement

नोकर भरतीतील जाचक अटी रद्द करा

पुणे महानगरपालिकेने काढलेल्या नोकरभरती जाहिरातीमध्ये आरोग्य निरीक्षक या पदासाठी पाच वर्षाच्या अनुभवाची अनावश्यक जाचक अट घालण्यात आली होती. या अटीमुळे साधारणता दहा हजार विद्यार्थी हे परीक्षा देण्यापासून वंचित राहणार होते. ही अट रद्द करण्यात यावी या मागण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन सरळ सेवा पद भरतीसाठी अनुभवाची अट ही नियमबाह्य आहे ती रद्द करावी अशी मागणी केली यावेळी अभय छाजेड,कमल व्यवहारे,मा.बाळासाहेब शिवरकर,एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष आमीर शेख, संगीता तिवारी,दत्ता बहिरट, सुनिल शिंदे,मुख्तार शेख,भुषण राणभरे व इतर पदाधिकारी अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी बळिराम डोळे हे उपस्थित होते.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement