लसीकरणाच्या विक्रमावर राष्ट्रवादीचा आक्षेप: ​​​​​​​मोदींच्या वाढदिवसाला नवा विक्रम करण्यासाठी 15 ते 20 दिवस आधी लसीकरण कमी करण्यात आले; नवाब मलिकांचा आरोप


Advertisement

मुंबईएका तासापूर्वी

  • कॉपी लिंक
  • मोदींच्या वाढदिवसाला रेकॉर्ड लसीकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर देशात लसीकरणाचा नवा विक्रम नोदंवला गेला आहे. देशात एका दिवसात पावने तीन कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी जास्तीत जास्त लोकांना लसीचा डोस द्यावा असे निर्देश भाजपने देशभरातील आपल्या युनिट्सना दिले होते.

Advertisement

मोदींच्या वाढदिवसादिवशी झालेल्या लसीकरणावर विरोधी पक्षांकडून जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी लसीकरणाच्या विक्रमावर आक्षेप घेतला आहे. मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी नवा विक्रम नोदंवण्यासाठी 15 ते 20 दिवस आधी कमी लसीकरण करण्यात आले असा आरोप मलिक यांनी केला आहे.

काय म्हणाले नवाब मलिक?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशात पावने तीन कोटी लोकांचे लसीकरण आले. जर एका दिवसात एवढ्या लोकांचे लसीकरण होऊ शकते तर मग आज, उद्या आणि महिनाभर का होऊ शकत नाही असा सवालही मलिक यांनी उपस्थित केला. मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी नवा लसीकरणाचा विक्रम नोदंवण्यासाठी 15 ते 20 दिवस आधी लसीकरण कमी करण्यात आले. कोणत्याही व्यक्तीच्या गौरवासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम अन्यायकारक आहेत असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

Advertisement

मोदींच्या वाढदिवसाला रेकॉर्ड लसीकरण
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काल 71 वा वाढदिवस होता. याच पार्श्वभूमीवर देशात आज लसीकरणाचा नवा विक्रम नोंदवला गेला. विशेष म्हणजे पहिल्या 9 तासांत देशातील 2 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले होते. त्यानंतर ही त्यामध्ये सातत्याने वाढ होत गेली. एका दिवसात पावने तीन कोटी लोकांना डोस देण्यात आले होते. विशेष म्हणजे प्रत्येक सेकंदला 527 पेक्षा जास्त लोकांना लस दिली जात होती. तासाला हा आकडा 19 लाख लाखांवर जात होता. यावरुन लसीकरणाची गती किती असेल याचा अंदाज येईल.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement