लसीकरणाचा लकी ड्रॉ: हिंगोलीत लसीकरणासाठी लकी ड्रॉ मोहिम यशस्वी, लसीकरणाची टक्केवारी 68 वरुन 83 टक्क्यांवर


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Vaccination | Marathi News | Hingoli | Lucky Draw Campaign For Hingoli Vaccination Successful, Vaccination Percentage Increased From 68 To 83 Percent

Advertisement

हिंगोली24 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

हिंगोली शहरामध्ये कोविड लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी पालिका प्रशासनाने बंपर लकी ड्रॉ योजना हाती घेतली. या योजनेमध्ये लसीकरणाची टक्केवारी चांगलीच वाढली असून शनिवारी ता. १ नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लकी ड्रॉ काढून विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

Advertisement

हिंगोली जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालय सह शासनानेही तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी हिंगोली येथे भेट देऊन लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सूचना दिल्या होत्या. या संदर्भात योग्य नियोजन करावे अन्यथा कारवाई करण्याचा इशारा देखील केंद्रेकर यांनी दिला होता. त्यानंतर आरोग्य विभागाने लसीकरणासाठी नियोजनकरीत हर-हर दस्तक हा उपक्रम सुरू केला. यामध्ये घरोघर जाऊन लाभार्थ्यांना लसीकरण केले जात आहे.

दरम्यान जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहरात जास्तीत जास्त लसीकरण होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी बंपर लकी ड्रॉ योजना जाहीर केली. यामध्ये ता.१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीमध्ये लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांना मधून लकी ड्रॉ काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये पहिला डोस घेणाऱ्यांसाठी आठ पारितोषक व दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी आठ पारितोषिके ठेवण्यात आली होती.

Advertisement

या योजनेमुळे लसीकरणाला ही चांगला फायदा झाला पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची लसीकरणाची टक्केवारी ६८ वरून ८३ टक्के वर पोहोचली. तर दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची टक्केवारी ५६ वरून ६९ टक्के वर पोहोचली आहे.

दरम्यान आज पालिकेच्या सभागृहामध्ये पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे रत्नाकर महाजन, शाम माळवटकर, डॉ. नामदेव कोरडे, डॉ. नंदिनी भगत, सनोबर तसलीम, पालिका कर्मचारी बाळू बांगर, पत्रकार प्रद्युम्न गिरीकर यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ काढण्यात आला. विश्वास बांगर व जान्हवी कुरवाडे या मुलांच्या हस्ते ड्रॉ काढण्यात आला. यामध्ये विजेत्यांना पहिले पारितोषिक एलईडी टीव्ही, द्वितीय फ्रिज, तृतीय वॉशिंग मशीन व प्रोत्साहनपर पाच मिक्सर ग्राइंडर आदी पारितोषिक देण्यात आले.

Advertisement

दरम्यान अद्यापही शहरातील ज्या नागरिकांनी लसीकरण केले नाही त्यांनी तातडीने लसीकरण करुन घ्यावे. असे आवाहन मुख्याधिकारी कुरवाडे यांनी केले आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement