लग्न समारंभात चोऱ्या करणारे जेरबंद: आतंरराज्य टोळीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश‎


प्रतिनिधी | नगरएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

लग्न समारंभातून रोख रक्कम व‎ मोबाईलची चोरी करणारी आंतरराज्य‎ टोळी जेरबंद करण्यात येथील‎ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश‎ आले . या टोळीकडून एक लाख ४४‎ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत‎ करण्यात आला . प्रदीप कालुसिंग‎ दपानी (वय २४, रा. कडीयासासी,‎ जि. राजगड, मध्य प्रदेश), अमित‎ पन्नासिंग सासी (वय १९, रा.‎ लक्ष्मीपुरा जि. बारहा, राजस्थान)‎ अशी चोरट्यांची नावे आहेत.‎

Advertisement

यमुना रघुनाथ लांडगे (वय ७५ रा.‎ लांडगेमळा, ता. नगर) या १२ मे रोजी‎ मनमाड रोडवरील बंधन लॉन येथे‎ लग्न समारंभात असताना चोरट्याने‎ दोन लाख १० हजार रूपये किंमतीचा‎ ऐवज असलेली पर्स चोरली होती. ही‎ घटना घडल्यानंतर स्थानिक गुन्हे‎ शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या‎ मार्गदर्शनाखाली अंमलदार मनोज‎ गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप‎ पवार, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डीले,‎ संतोष खैरे, रोहित मिसाळ, रणजीत‎ जाधव, आकाश काळे, अमृत‎ आढाव, मेघराज कोल्हे, प्रशांत‎ राठोड, फुरकान शेख, संभाजी‎ कोतकर यांचे पथक समांतर तपास‎ करत होते. या गुन्ह्यातील चोरटे हे‎ मध्यप्रदेश पासींगच्या दुचाकीवरून‎ पुणे येथून नगर जिल्ह्याकडे येत‎ आहेत, अशी माहिती निरीक्षक आहेर‎ यांना मिळाली होती.

निरीक्षक आहेर‎ यांनी पथकास कारवाई करण्याचे‎ आदेश दिले. पथकाने सुपा टोल नाका‎ परिसरात सापळा लाऊन दोघांना‎ पकडले. त्यांच्याकडे ८० हजार रूपये‎ रोख रक्कम व दोन मोबाईल फोन‎ मिळून आले. सदरची रक्कम ही नगर‎ शहरातील बंधन लॉन्स येथील लग्न‎ समारंभामध्ये चोरी केल्याचे त्यांनी‎ सांगितले. त्यांनी एक लाख रूपये‎ वसंत कुमार (पुर्ण नाव माहित नाही,‎ रा. मध्यप्रदेश) व कालुसिंह (पुर्ण नाव‎ माहित नाही, रा. लक्ष्मीपुरा,‎ राजस्थान) यांच्या बँक खात्यामध्ये‎ पाठविल्याचे सांगितले. तसेच‎ गुन्ह्यातील चोरी केलेले मोबाईल‎ फेकून दिल्याची कबूली त्यांनी दिली.‎ सदर गुन्हा करताना साथीदार‎ भुपेद्रसिंह अर्जुनसिंह भानेरीया याच्या‎ सोबत केल्याची कबुलीही दिली.‎

AdvertisementSource link

Advertisement