नाशिक2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
गाेरगरीब विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेत आधुनिक शिक्षण माेफत देण्याच्या उद्देशातून लागु केलेल्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत अर्ज दाखल करण्याची मुदत २५ मार्चपर्यंत वाढवण्यात आली असून महापालिका क्षेत्रातील ८९ शाळांमधील १७७९ जागा शिल्लक आहेस. ही बाब लक्षात घेत गरजु पालकांनी तातडीने अर्ज भरण्याची प्रक्रिया वाढीव मुदतीत पुर्ण करावी असे आवाहन शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी केले आहे.
राज्यात शिक्षणाचा अधिकार या कायद्यांतर्गत 25 टक्के ऑनलाईन राखीव जागावर गाेरगरीब वा अर्थिक दुर्बल पाल्यांना प्रवेश दिला जाताे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता प्राथमिक शिक्षण संचालनालयाने २५ मार्च २०२३ राेजी रात्री १२ वाजेपर्यंत सुविधा देण्यात आली आली हाेती. त्यानुषंगाने नाशिक मनपा नागरी साधन केंद्र १ मध्ये ५१ तर नाशिक मनपा नागरी साधन केंद्र २ मध्ये ३८ शाळा आहेत. यापैकी दोन शाळांमध्ये नर्सरीसाठी एन्ट्री लेव्हल आहे. मनपा क्षेत्रात ८९ शाळांमध्ये १७७९ इतक्या जागा उपलब्ध आहेत. दरम्यान, गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही प्रवेशासाठी राज्यस्तरावरून एकच सोडत जाहीर हाेणार असून शाळेत आरटीई अंतर्गत उपलब्ध जागा एवढी एक प्रतीक्षा यादी तयार केली जाईल.
प्रवेशासाठी एक नियमित फेरी राबविली जाईल. त्यानंतर जागा रिक्त राहिल्यास टप्याटप्याने प्रतीक्षा यादीनुसार प्रवेश होतील. पालकाने एकाच पाल्याचे एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरला जाणार नाही. असे कळवले आहे.
पालिकेच्या दाेन मदत केंद्रांवर मिळणार मदत
मनपा शिक्षण विभागाअंतर्गत दोन मदत केंद्र सुरु आहेत. नागरी साधन केंद्र 1, समग्र शिक्षा अभियान कार्यालय, पोलीस मुख्यालय, गंगापूर रोड, नाशिक संपर्क क्र. 0253- 2951118 सुनीता जाधव 7385576195, नागरी साधन केंद्र 2, समग्र शिक्षा अभियान कार्यालय, मनपा शाळा क्र. 55, जेतवन नगर, जय भवानी रोड, नाशिक रोड, नाशिक संपर्क क्र. 0253- 2415200 मंजुषा कापसे 7020362248, 9822060844
या संकेतस्थळावर करा अर्ज
ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी २५ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत अर्ज करता येईल. त्यासाठी इच्छुकांनी https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/users/rteindex या संकेतस्थळावरावरून प्रक्रिया करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
ही कागदपत्रे आवश्यक
निवासी पुराव्यासाठी शिधापत्रिका, वाहन चालवण्याचा परवाना, वीज, दूरध्वनी देयक, मिळकत कर देयक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र,पारपत्र, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक इ. भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. भाडेकरार हा अर्ज भरण्याचा दिनांका पूर्वीचा असावा.
अर्ज सादर करताना जमा करावयाच्या कागदपत्राची माहिती पालकांनी योग्य पद्धतीने जाणून घेणे गरजेचे आहे. शासनाच्या संकेतस्थळावर याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध असल्याचे कळवले आहे.