लखनौने कोलकाताचा ९९ धावांनी उडवला धुव्वा, नेट रनरेटवर मोठा परिणाम

लखनौने कोलकाताचा ९९ धावांनी उडवला धुव्वा, नेट रनरेटवर मोठा परिणाम
लखनौने कोलकाताचा ९९ धावांनी उडवला धुव्वा, नेट रनरेटवर मोठा परिणाम

लखनौ सुपर जायंटचे १७७ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला लखनौ सुपर जायंटच्या गोलंदाजांनी १०१ धावांवर डाव गुंडळला. लखनौने केकेआरवर ७५ धावांनी दणदणीत विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. केकेआरकडून आंद्रे रसेलने ४५ धावा करत एकाकी झुंज दिली. तर लखनौकडून आवेश खानने १९ धावा देत ३ विकेट घेतल्या त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला. तसेच त्याला जेसन होल्डरची ३ विकेट घेऊन मदत केली.

लखनौने केकेआर विरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पहिल्याच षटकात केएल राहुलच्या रूपात आपली पहिली विकेट गमावली होती. त्यानंतर क्विटंन डिकॉक आणि दीपक हुड्डाने भागीदारी रचत डाव सावरला होता. डिकॉक ५० धावांवर बाद झाल्यानंतर दीपक हुड्डा आणि क्रुणाल पांड्या यांनी लखनौला शतकी मजल मारून दिली. मात्र आंद्रे रसेलने ४१ धावांवर खेळणाऱ्या दीपक हुड्डाला आणि २५ धावा करून त्याला साथ देणाऱ्या क्रुणाल पांड्याला बाद करत मोठा धक्का दिला.

मात्र लखनौचा स्टार हिटर मार्कस स्टॉयनिसने शिवम मावी टाकत असलेल्या १९ व्या षटकात पहिल्या तीन चेंडूवर तीन षटकार मारत धडाक्यात सुरूवात केली. मात्र मावीने स्टॉयनिसला (२८) चौथ्या चेंडूवर बाद केले. परंतू त्यानंतर आलेल्या जेसन होल्डरने मावीला पुन्हा शेवटच्या दोन चेंडूवर दोन षटकार लगावात एकाच षटकात ३० धावा वसूल केल्या.

Advertisement

केकेआरला १९ वे षटक महागडे पडल्यानंतर २० षटक टाकण्यासाठी आलेल्या साऊदीने टिच्चून मारा केला. त्याने ४ धावा देत एक विकेट घेतली. यामुळे केकेआरला लखनौला १७६ धावांवर थोपवणे सोपे गेले. त्याआधी नाणेफेक राहुलच्या बाजूने गेल्याने त्याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरचा सर्वात यशस्वी गोलंदाज उमेश यादव आजच्या महत्वाच्या सामन्यात खेळला नाही. दुखापतीमुळे तो संघाबाहेर होता. त्याची जागा हर्षित राणाने घेतली. लखनौनेही आपल्या संघात बदल केला होता आवेश खानने गौतमची जागा घेतली.

Advertisement