लखनऊ सुपर जायंट्सच्या कर्णधाराने पगार वाढवून देण्याची मागणी केली, १७ कोटी अपुरे पडले केएल ला…

लखनऊ सुपर जायंट्सच्या कर्णधाराने पगार वाढवून देण्याची मागणी केली, १७ कोटी अपुरे पडले केएल ला...
लखनऊ सुपर जायंट्सच्या कर्णधाराने पगार वाढवून देण्याची मागणी केली, १७ कोटी अपुरे पडले केएल ला...

सध्या चालू असलेल्या आयपीएल २०२२ मध्ये प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणारा दुसरा खेळाडू ठरला. संघाच्या कामगिरीवर लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल खूश दिसला. विशेषतः संघ ज्या पद्धतीने पुढच्या टप्प्यात पोहोचला त्यामुळे त्याला अधिक आनंद झाला. लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यानंतर नक्कीच सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. या विजयासह लखनऊ सुपर जायंट्स प्ले ऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरला आहे. आता उर्वरित दोन जागांसाठी पाच संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले असले, तरीही ते उर्वरित संघांची समीकरणे बिघडू शकतात. लखनऊ सुपर जायंट्सच्या दोन धावांनी रोमहर्षक विजयानंतर केएल राहुलने गमतीने म्हटले की अशा सामन्यांसाठी मला अतिरिक्त पैसे मिळायला हवेत.

Advertisement

“मला अशा खेळांसाठी कदाचित जास्त पैसे मिळायला हवेत. या मोसमात आम्ही असे सामने गमावले होते. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेले बरेच सामने नाहीत, कदाचित काही शेवटच्या षटकापर्यंत गेले. विजयाच्या बाजूला असल्याचा आनंद आहे. आम्ही सहज पराभूत होऊ शकलो असतो आणि काही खराब क्रिकेटमुळे आम्ही हरलो असा विचार करून घरी परतलो असतो. लीग हंगामातील शेवटचा खेळ समाप्त करण्याचा चांगला मार्ग आहे. क्रिकेटचा असा शानदार खेळ करण्याचे श्रेय दोन्ही संघांना. मी असे म्हणू शकत नाही की आम्ही संयम राखले कारण ही तीन धावांची बाब होती,” केएल राहुलने सामन्यानंतरच्या सादरीकरणात सांगितले.

मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवरील कोलकाताविरुद्धच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सच्या सलामीच्या जोडीने २० षटकांच्या शेवटी २१० धावांसह नाबाद राहून अनेक विक्रम मोडीत काढले. क्विंटन डी कॉक आणि कर्णधार राहुल, या दोघांनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च सलामी भागीदारीची नोंद केली. क्विंटन डी कॉक १४० धावा करून नाबाद राहिला.

Advertisement