रोहित शर्मा राजीनामा देण्याच्या तयारीत भावनिक पोस्ट शेअर करत दिली मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना माहिती

रोहित शर्मा राजीनामा देण्याच्या तयारीत भावनिक पोस्ट शेअर करत दिली मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना माहिती
रोहित शर्मा राजीनामा देण्याच्या तयारीत भावनिक पोस्ट शेअर करत दिली मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना माहिती

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२मध्ये सलग ८ सामने गमावले आहेत. या निराश कामगिरीनंतर रोहितने एक भावनित पोस्ट शेअर केली आहे. विक्रमी पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सने १५व्या हंगामात सलग ८ सामन्यात पराभव स्विकारलाय. आयपीएल २०२२मधून बाहेर पडणारा मुंबई हा पहिला संघ ठरलाय. मुंबई संघाची ही कामगिरी पाहून फक्त संघाच्या चाहत्यांना नाही तर अन्य संघांना देखील विश्वास बसत नाहीय. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने आता एक मोठ वक्तव्य केले आहे.

रोहितच्या मते, संघाने सर्वोत्तम प्रयत्न केला नाही. पण कधी कधी असे होते. सलग आठ पराभवानंतर रोहितने एक भावनिक ट्विट केले आहे. त्याच्या या ट्विटनंतर अशी चर्चा सुरू झाली आहे की रोहित कर्णधारपद सोडणार आहे. काही लोकांनी रोहितला नेतृत्व सोडण्याचा सल्ला देखील दिलाय. तर काहींनी त्याला पाठिंबा दिलाय. रविवारी लखनौ सुपर जायंट्सने मुंबईचा ३६ धावांनी पराभव केला. या पराभवानंतर मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलाय. आयपीएलच्या इतिहासात सुरुवातीच्या आठ लढती गमावणारा तो पहिला संघ ठरलाय.

Advertisement

रोहितने २५ एप्रिल रोजी एक ट्विट केले आहे. त्यात तो म्हणतो, या स्पर्धेत आम्ही सर्वोत्तम कामगिरी केली नाही, पण असे होते. अनेक दिग्गज अशा टप्प्यातून जातात. मला हा संघ आणि येथील वातावरण आवडते. त्याच बरोबर शुभचिंतकांचे आभार व्यक्त करतो, त्यांनी आतापर्यंत संघावर विश्वास आणि निष्ठा दाखवली.

आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी संघ असलेले मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांची कामगिरी यावेळी खराब झाली आहे. मुंबई पाठोपाठ आता चेन्नईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतो. पण चेन्नईला अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे.

मुंबईने लिलावात हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या यांना संघात घेतले नाही. तर अन्य महत्त्वाचे खेळाडू अन्य संघात गेले. गेल्या काही वर्षात ज्यांनी मुंबईला विजय मिळवून दिला ते आता मुंबई सोबत नसल्याने त्याचा फटका संघाला बसला. मुंबईने रोहित, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि कायरन पोलार्ड यांना रिटने केले होते. मेगा लिलावात त्यांनी ईशान किशनसाठी १५.२५ कोटी इतकी रक्कम मोजली होती.

Advertisement