रोहित शर्माने टाटांनी दिलेले असे कोणते आव्हान होते ते त्याने पूर्ण केले, संपूर्ण वाचा…

रोहित शर्माने टाटांनी दिलेले असे कोणते आव्हान होते ते त्याने पूर्ण केले, संपूर्ण वाचा...
रोहित शर्माने टाटांनी दिलेले असे कोणते आव्हान होते ते त्याने पूर्ण केले, संपूर्ण वाचा...

गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने अल्जारी जोसेफला असा षटकार मारला ज्यामुळे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला ५ लाख रुपये मिळाले. पाहा व्हिडिओ आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या गुजरात टायटन्सचा काल शुक्रवारी मुंबई इंडियन्सने पराभव केला. या सामन्यात अखेरच्या षटकात अफलातून गोलंदाजी करणारा डेनियल सॅम्स मुंबईच्या सलग दुसऱ्या विजयाचा हिरो ठरला. मुंबईने रोहित शर्मा, ईशान किशन आणि टिम डेव्हिड यांच्या जोरावर २० षटकात १७७ धावा केल्या होत्या. उत्तरादाखल गुजरातला १७२ धावा करता आल्या. मुंबईने ही लढत ५ धावांनी जिंकली.

मुंबई-गुजरात सामन्यातील अखेरच्या षटकाची चर्चा सुरू आहे. त्याच बरोबर या सामन्यात अशी एक घटना घडली ज्यावर सर्वजण मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याचे कौतुक करत आहेत. रोहित शर्माला प्राण्यांबद्दल प्रेम आहे, त्यांच्या बचावासाठी आणि सुरक्षेसाठीच्या अभियानात रोहित नेहमी पुढाकार घेतो आणि सहभागी देखील असतो. गुजरात विरुद्धच्या सामन्यात रोहितने अशा एक शॉट मारला ज्यामुळे आसाममध्ये आढळणाऱ्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील एक शिंगी गेंड्याला ५ लाख रुपये मिळाले. रोहितने डावातील दुसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर डीप मीडविकेटच्या दिशने षटकार मारला.

Advertisement

वेस्ट इंडिजचा गोलंदाज अल्जारी जोसेफने टाकलेल्या लेंथ चेंडूवर रोहितने कडकटत षटकार मारला. हा शॉट इतका अफलातून होता की चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषेबाहेर गेला. रोहितने मारलेला चेंडू टाटा पंच वर जाऊन लागला आणि त्यामुळेच काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला पाच लाख रुपये मिळाले. रोहितच्या या शॉटमुळे फक्त मुंबई इंडियन्सला ६ धावा मिळल्या तर एक चांगले काम देखील झाले.

रतन टाटा हे आयपीएलचे अधिकृत प्रायोजक आहेत. टाटांनी अशी घोषणा केली होती की जर एखाद्या फलंदाजाने सीमारेषेबाहेर असलेल्या पंच कारवर चेंडू मारला तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला ५ लाख रुपये टाटांकडून दिले जातील. हे राष्ट्रीय उद्यान एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे.

Advertisement