रोहित पवार यांचा राज्य सरकारला इशारा: तलाठी भरतीसह इतर सर्व भरती प्रक्रियेतील काळाबाजार बाहेर काढणार; शिरसाट यांच्यावरही टीका

रोहित पवार यांचा राज्य सरकारला इशारा: तलाठी भरतीसह इतर सर्व भरती प्रक्रियेतील काळाबाजार बाहेर काढणार; शिरसाट यांच्यावरही टीका


मुंबई7 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

तलाठी भरतीसह इतर सर्व भरती प्रक्रियेत काळाबाजार सुरु असून सरकार मुद्दामहून खासगी कंपनीकडून ही प्रक्रिया राबवत आहे. या भरतीचा पेपर अनेक वेळा फुटलेला असूनही चुकीचे घडूनही त्याची पाठराखण ह सरकार करत आहे यामध्ये सुधारणा न झाल्यास शिक्षक भरती, प्राध्यापक भरतीतील काळाबाजारा विरोधात आम्ही रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.

Advertisement

कोल्हापूर दौऱ्यावर जाण्यापूर्वी आमदार रोहित पवार कऱ्हाड येथे काहीकाळ थांबले हाोते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्या सुरू असलेल्या भरतीमध्ये काळाबाजार सुरु आहे. सरकार मुद्दाहुन खाजगी कंपन्यांकडून भरती करत आहे. पेपर अनेक वेळा फुटलेले आहेत. त्यामध्ये एफआयआर दाखल होवुनही सरकार उलट पेपर कुठे फुटलाय असे म्हणत आहे. कुठेतरी चुकीचे घडते आहे आणि त्याची पाठराखण सरकार करत आहे.

रस्त्यावर उतरणार

Advertisement

रोहित पवार म्हणाले की, सामान्य युवकांच्या जीवावर सरकार राजकारण करत आहे. पुढच्या काही दिवसात यामध्ये सुधारणा न झाल्यास शिक्षक भरती, प्राध्यापक भरतीत जो काही काळाबाजार चालला आहे. या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.

शिरसाट यांच्यावर जोरदार टीका

Advertisement

रोहित पवार म्हणाले की, संजय शिरसाट यांना मंत्री व्हायचे आहे आणि याबाबत ते स्वतः बोलले आहे. संजय शिरसाट प्रवक्ते असल्यामुळे त्यांच्या पोटात कुठेतरी दुखत आहे. मंत्री पदासाठी आम्ही लाचार नाही. त्याचबरोबर आम्ही आमची नियत कुठे विकलेली नाही. म्हणून तुम्ही कुठलेही राजकीय पतंग उडू नका. आमच्यासाठी मंत्रीपदापेक्षा विचार महत्त्वाचे आहे. शरद पवार यांच्या सभेपूर्वी रोहित पवारांनी भाजपवर देखील खोचक टीका केली आहे. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे राजकीय विचार जिथे संपतात तिथे शरद पवारांचे विचार सुरू होतात. शरद पवारांचा राजकीय अनुभव 60 वर्षाचा आहे. भाजपने आत्तापर्यंत पक्ष फोडला, कुटुंब फोडले. शरद पवार आधीपासूनच भाजपला टार्गेट करतात.



Source link

Advertisement