रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने हैदराबाद विरुद्धचा बदला घेत ६६ धावांनी मात देत जवळपास निश्चित केले स्थान

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने हैदराबाद विरुद्धचा बदला घेत ६६ धावांनी मात देत जवळपास निश्चित केले स्थान
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने हैदराबाद विरुद्धचा बदला घेत ६६ धावांनी मात देत जवळपास निश्चित केले स्थान

रविवारी आयपीएल २०२२मधील ५४वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळला गेला. या सामन्यात बेंगलोर संघाने ६७ धावांनी विजय मिळवला. हा त्यांचा हंगामातील सातवा विजय होता. या विजयाचा हिरो वनिंदू हसरंगा ठरला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार फाफ डू प्लेलिस याने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी विराट कोहली सोडला, तर इतर फलंदाजांना त्याचा हा निर्णय प्राथमिकरीत्या योग्य सिद्ध केला होता.

बेंगलोरने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ३ विकेट्स घेत १९२ धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाला १९.२ षटकात सर्व विकेट्स गमावत १२५ धावाच करता आल्या. त्यामुळे बेंगलोरने ६७ धावांनी सामना आपल्या नावावर केला. यावेळी बेंगलोरकडून गोलंदाजी करताना वनिंदू हसरंगा याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना १८ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त जोश हेजलवूडने २ विकेट्स घेतली. तसेच, ग्लेन मॅक्सवेल आणि हर्षल पटेलने १ विकेट आपल्या नावावर केली.

Advertisement

हैदराबादकडून फलंदाजी करताना फक्त राहुल त्रिपाठीलाच शानदार कामगिरी करता आली. त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. बेंगलोरविरुद्ध त्याने ३७ चेंडूत ५८ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त एडेन मार्करमने २१ आणि निकोलस पूरनने १९ धावांचे योगदान दिले होते. याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडा पार करता आला नाही. कर्णधार केन विलियम्सन देखील शून्य धावसंख्येवर धावबाद होऊन तंबूत परतला. हैदराबादचे ४ फलंदाज तंबूत परतले.

Advertisement

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक नाबाद ७३ धावा केल्या. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ८ चौकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त रजत पाटीदार याने ४८ धावा, ग्लेन मॅक्सवेल याने ३३ धावा आणि दिनेश कार्तिक याने नाबाद ३० धावा केल्या. यावेळी माजी कर्णधार विराट कोहली याला पुन्हा एकदा गोल्डन डकवर बाद व्हावे लागले. मात्र, त्याचा संघाच्या धावसंख्येवर कोणताही परिणाम झाला नाही.

यावेळी हैदराबादकडून गोलंदाजी करताना जगदीश सुचिथने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ३० धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त कार्तिक त्यागीने १ विकेटवर आपले नाव कोरले. या विजयासह बेंगलोर संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, हैदराबाद संघ सहाव्या क्रमांकावर आहे.

Advertisement