रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्याचा ‘खडखडाट’: मध्य रेल्वेच्या आदेशानंतरही सोलापूर स्थानकावर पाणीबाणी

प्रतिनिधी | सोलापूर12 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मध्य रेल्वेचा आयआरसीटीसी सोबतचा पाणी वेंडिंग मशीनचा करार संपुष्टात आल्याने आता अनेक रेल्वे स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कोलमडली आहे. सोलापूरसह राज्यात अनेक ठिकाणी रेल्वे स्थानकात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावू शकते. त्याचा प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी मध्य रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक स्वप्निल वाळींजकर यांनी रेल्वे विभागाला आपापल्या परीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि प्रवाशांना कोणताही त्रास होऊ देऊ नये, असे आदेश काढले आहेत. परंतु सोलापूर रेल्वे विभागाने याबाबत अजून कोणताही विचार केलेला नाही. सगळ्या वेंडिंग मशीन धूळखात पडलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना पैसे मोजूनच पाणी घ्यावे लागत आहे.

Advertisement

रेल नीरचा तुटवडा आणि खासगी लोकांकडून लुबाडणूक

रेल नीर कमी खर्चात मिळावे यासाठी रेल्वेने विशिष्ट व्यक्तींना याचे टेंडर देऊन पाण्याचा पुरवठा अनेक वर्षांपासून सुरू ठेवला आहे. परंतु उन्हाळ्यात तुटवडा जाणवतो. खासगी लोक रेल्वे प्रवाशांना १५ रुपयांची बाटली ‘थंड’ पाण्याच्या नावाखाली २० रुपयांना विकतात. याचाही भुर्दंड सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागतो. या सर्व गोष्टींकडे रेल्वे प्रशासन सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.

Advertisement

स्थानिक प्रशासनाने पाण्याची व्यवस्था करावी

आयआरसीटीसीसोबतचा करार संपुष्टात आला असून, या संदर्भात प्रत्येक रेल्वे विभागाला सूचना दिली आहे. त्यानुसार त्यांनी त्यांच्या स्तरावर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. याबाबतची अंमलबजावणी बंधनकारक अाहे. ती होण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. स्वप्निल वाळींजकर, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे – मुंबई

Advertisement

मध्य रेल्वेचा आयआरसीटीसी सोबतचा पाणी वेंडिंग मशीनचा करार संपुष्टात आल्याने आता अनेक रेल्वे स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कोलमडली आहे. सोलापूरसह राज्यात अनेक ठिकाणी रेल्वे स्थानकात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावू शकते. त्याचा प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी मध्य रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक स्वप्निल वाळींजकर यांनी रेल्वे विभागाला आपापल्या परीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि प्रवाशांना कोणताही त्रास होऊ देऊ नये, असे आदेश काढले आहेत. परंतु सोलापूर रेल्वे विभागाने याबाबत अजून कोणताही विचार केलेला नाही. सगळ्या वेंडिंग मशीन धूळखात पडलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना पैसे मोजूनच पाणी घ्यावे लागत आहे.

करार संपुष्टात येताच सोलापूर रेल्वे प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची काही तरी व्यवस्था करायला हवी होती. अजून तरी प्रशासन ढिम्मच असल्याचे दिसते. दुसरीकडे प्रवाशांना लांबच्या प्रवासात १५ किंवा २० रुपये मोजूनच पाणी घ्यावे लागत आहे. वास्तविक रेल्वे स्थानकावर गाडीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी ही रेल्वे प्रशासनाची आहे. त्याबाबत थेट वरूनच निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता रेल्वे प्रशासन नेमके काय करते, याकडे लक्ष लागले आहे.

AdvertisementSource link

Advertisement