रेल्वेमंत्र्यांनी स्वतः जेसीबी चालवून पीटलाईनची पायाभरणी केली: अधिकारी म्हणाले- ऑनलाईन सुविधा आहे; मात्र, मंत्र्यांनी घटनास्थळ गाठले  • Marathi News
  • National
  • Aurangabad Railway Pit Line, Latest News And Update, Minister Ashwini Vaishnav Lays Foundation Stone

औरंगाबाद6 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

जालना शहरातील रेल्वे पीटलाईन प्रकल्पाचा औरंगाबाद शहरातून ऑनलाईन पायाभरणी करण्यास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी नकार दिला आहे. त्यांनी चक्क जालना शहर गाठून घटनास्थळावरील विकासकामांची पायाभरणी केली. विशेष बाब म्हणजे, रेल्वेमंत्री वैष्णव यांनी स्वतःच जेसीबी चालवून खड्डा खोदून पीटलाईनच्या कामाचा शुभारंभ केला आहे.

Advertisement

वैष्णव यांनी पीटलाईन कामाच्या शुभारंभाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. जेसीबी चालवून मंत्र्यांनी अनोख्या पद्धतीने विकासकामांचा शुभारंभ केल्याने याची चर्चा होऊ लागली आहे. मुळात औरंगाबाद शहरात कोच मेटेंनन्स फॅक्टरीच्या शुभारंभ समारंभाला रेल्वेमंत्र्यांनी हजेरी लावली होती. यादरम्यान जालन्यात होणाऱ्या पीटलाईनच्या कामाचा ऑनलाईन शुभारंभ करण्याची विनंती अधिकाऱ्यांनी त्यांना केली. त्यानंतर हा प्रकार घडला.

मंत्री म्हणाले- ऑनलाइन पायाभरणी कशी होईल
पायाभरणीसाठी ऑनलाइन यंत्रणा असल्याचे अधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्र्यांना सांगितले. मात्र मंत्र्यांनी त्यास चक्क नकार दिला. त्यांनी अधिकाऱ्यांना विचारले की, पायाभरणी ऑनलाइन कशी केली जाईल.? यानंतर मंत्र्यांनी थेट जालना रेल्वेस्थानक गाठण्याचा निर्णय घेतला. तेथे पोहोचल्यानंतर अधिकाऱ्यांना जेसीबी मागविण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर स्वतः जेसीबीवर चढून वैष्णव यांनी खड्डा खोदत पायाभरणी झाल्याचे जाहीर केले. तर कामाला गती द्यावी, असे अधिकाऱ्यांना सूचित करावे.

Advertisement

200 रेल्वेस्थानकांच्या पुर्नविकासासाठी मास्टर प्लॅन

कार्यक्रमस्थळी जाण्यापूर्वी केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले की, केंद्र सरकारने देशभरातील किमान 200 रेल्वे स्थानकांना आधुनिक सुविधांसह पुनरुज्जीवित करण्यासाठी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. 47 रेल्वे स्थानकांसाठी निवीदा प्रक्रिया पूर्ण झाली असून 32 स्थानकांवर सद्यस्थितीत काम देखील सुरू झालेले आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement