मुंबईएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
ईडी चौकशीनंतर आपल्याला अजित पवारांचा फोन आला नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीच्या चर्चेने जोर धरला आहे.
जयंत पाटील यांची ईडीने सलग साडेनऊ तास चौकशी केली. त्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत त्यांची पाठराखण केली. मात्र, अजित पवारांचा फोन आला नसल्याचे प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. त्यामुळे दोघात पुन्हा बिनसले का, याची चर्चा सुरू झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांनी राजीनामा दिला. त्यानंतर भावुक झालेले जयंत पाटील उभ्या महाराष्ट्राने पाहिले. तुम्ही गेल्यानंतर आम्ही काय करायचं, असा सवाल त्यांनी थोरल्या पवारांना केलेला. मात्र, त्याचवेळी अजित पवार मात्र त्यांनी वयोपरत्वे राजीनामा दिला. आज ना उद्या हे होणारच होते, असे म्हणत या राजीनाम्याचे समर्थन करत राहिले.
खरे तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारानंतर कोण, याची चर्चा सुरू असते. त्यात पक्षांतर्गत गट-तट आहेतच. कधी जयंत पाटील, कधी अजित पवार, तर कधी सुप्रिया सुळे यांचे नाव यात पुढे असते. या राजकारणातूनच जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यातल्या नाराजीनाट्याच्या चर्चा रंगतात. शरद पवारांच्या निवृत्ती घोषणेनंतर पक्षाने दुसऱ्या दिवशी बैठक बोलावली होती. त्याचेही जयंत पाटील यांना निमंत्रण नव्हते. त्यावरून पाटील नाराज असल्याची चर्चा रंगली. मात्र, पुन्हा अशी काही बैठकच बोलावली नसल्याचे सांगण्यात आले.
जयंत पाटील यांची ईडीने काल चौकशी केली. त्यांच्या पाठराखणासाठी शरद पवार मैदानात उतरले. सकाळी छगन भुजबळांनी किल्ला लढवला. तर आपल्याला महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेत्यांचे फोन आले. आमच्या वेगवेगळ्या पक्षातील मित्रांचे फोन आले. कुणा एकाचे नाव राहिले, तर चूक होईल, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
ईडीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांचे पूर्ण समाधान केले. त्यांच्याकडे प्रश्न राहिले असतील, असे वाटत नाही. माझे कर्तव्य मी पार पडले, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. मात्र, माध्यमांनी अजित पवारांचा फोन आला होता का, असा प्रश्न केला. तेव्हा ‘त्यांचा फोन आलेला नाही’ असे त्यांनी थेट सांगितले. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळेच दोघांतल्या नाराजीच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे.
इतर बातम्याः
2024ला ईडी कार्यालयात कोणा-कोणाला पाठवायचे, याची यादी लवकरच जाहीर करू- संजय राऊत
मुंबईत बॉम्बस्फोट घडवणार, पोलिसांना ट्विटरवरून धमकी; सलग दुसऱ्या इशाराने खळबळ