रिक्षा चालकाकडून दवाखान्यात नेण्याचा बहाण्याने प्रवाशाला बेदम मारहाण: पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल

रिक्षा चालकाकडून दवाखान्यात नेण्याचा बहाण्याने प्रवाशाला बेदम मारहाण: पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • A Passenger Was Brutally Beaten By A Rickshaw Driver On The Pretext Of Taking Him To The Hospital; A Case Has Been Registered Against The Duo At Bharti Vidyapeeth Police Station, Pune

पुणे3 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मैत्रिणीसोबत झालेल्या भांडणात जखमी झालेल्या तरुणास रिक्षा चालकाने दवाखान्यात नेण्याचा बहाणा केला. यानंतर रस्त्यात दारु पिल्यावर त्याच्या डोक्‍यात लोखंडी हत्याराने वार करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

विक्रम सुरेश पोकळे (वय -37,रा.धायरी) यानी दिलेल्या फिर्यादीनूसार रिक्षा चालक उल्हास सावंत( रा.भोर) आणि त्याच्या दाजी विरुध्द खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, विक्रम पोकळे याचे त्याच्या मैत्रणीबरोबर भांडण झाले होते. यामध्ये त्याच्या हाताला काच लागून जखम झाली. तो जखमी अवस्थेतच रात्री रस्त्याने चालला होता. यावेळी रिक्षा चाल्क उल्हास सावंत याने तुझ्या हाताला लागले आहे, तुला दवाखान्यात घेऊन जातो असे म्हणून रिक्षात बसवले. रिक्षात अगोदरच रिक्षा चालकाचा दाजी बसला होता. रिक्षा चालकाने आंबेगाव पठार येथील प्यासा बारमध्ये रिक्षा थांबवली. तेथून दारु घेऊन तीघेही रिक्षातच दारु पित बसले. दरम्यान काहीही कारण नसताना उल्हास सावंत याने रिक्षातून खाली उतरुण लोखंडी हत्याराने पोकळे याच्यावर वार केले. याप्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक घोगरे करत आहेत.

Advertisement

जबरदस्तीने मोबाईल हिसकावला

सिंग्नलवर थांबलेल्या दुचाकी चालकाचा मोबाईल हिसकावल्याची घटना शिवाजीनगर भागात घडली. याप्रकरणी स्वयंम राज पेंडुरकर (वय- २०, रा. कृष्णा नगर, निगडी) या तरुणाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार आणि त्याचा मित्र देवाशिष पाटील हे दुचाकीवरून चालले होते. वीर चाफेकर चौकात सिग्नलवर थांबले असता दुचाकीवरून आलेल्या दोघांनी स्वयंम पेंडुरकर याच्या हातातील ४० हजार किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस बडे करत आहेत.

Advertisement



Source link

Advertisement