पुन्हा तेवतिया शो! ओडिस स्मिथची एक चूक पंजाबला महागात पडली. सामन्याच्या अखेरच्या षटकात तिसऱ्या चौथ्या चेंडूवर स्मिथने ओव्हर थ्रो केला आणि तेवतिया स्ट्राईकवर आला. तेवतियाने शेटच्या दोन चेंडूवर १२ धावांची गरज असताना दोन षटकार ठोकत सामना जिंकून दिला. गुजरातचा सलामीवीर शुभमन गिल अखेर १९ व्या षटाकत बाद झाला. त्याला रबाडाने ९६ धावांवर बाद केले. शुबमन गिलच्या ९६ धावांच्या खेळीने गुजरात टायटन्सने चढवला विजयाचा मुकुट चढवला त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
साई सुदर्शन बाद झाल्यानंतर गुजरातची धावगती थोडी मंदावली. मात्र त्यानंतर हार्दिक पांड्या आणि गिलने आक्रमक फटके मारत सामना जवळ आणण्याचा प्रयत्न केला. राहुल चाहरने गुजरातची शतकी भागीदारी करणारी जोडी फोडली. पदार्पण करणाऱ्या साई सुदर्शनला चहरने ३५ धावांवर बाद केले.
गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत पंजाब किंग्जला पॉवर प्लेमध्येच धक्के देण्यास सुरूवात केली. त्यांनी मयांक अग्रवाल आणि जॉनी बेअरस्टोला स्वस्तात बाद केले. नवीन चेंडू टाकणाऱ्या हार्दिकने पुन्हा एकदा पॉवर प्लेमध्ये मयांक अग्रवाल सारखी मोठी विकेट काढून दिली. त्यानंतर हंगामातील पहिलाच सामना खेळणारा बेअरस्टोला लोकी फर्ग्युसनने बाद केले.
मात्र त्यानंतर शिखर धवन आणि लिम लिव्हिंगस्टोनने भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. ही जोडी जमते असे वाटत असतानाच राशिद खानने शिखर धवनला (३५) बाद करत मोठा धक्का दिला. त्यानंतर लिव्हिंगस्टोनने तुफान फटकेबाजी सुरू केली. यामुळे संघाचे शतक धावफलकावर लागले. मात्र दुसऱ्या बाजूने इतर फलंदाज बेजबाबदार फटके मारून बाद होत होते. जितेश शर्मा आणि ओडिन स्मिथ पाठोपाठच्या चेंडूवर बाद झाले. त्यांना पदार्पण करणाऱ्या दर्शन नाळकांडे बाद केले.
दरम्यान, पंजाबच्या बॅटिंगची जबाबदारी एकहाती सांभळलेला लिव्हिंगस्टोन देखील ६४ धावांची खेळी करून बाद झाला. शाहरूख खानने देखील दोन षटकार मारून पुन्हा निराशा केली. गुजरातकडून राशिद खानने भेदक मारा करत ३ तर दर्शन नाळकांडेने २ विकेट घेतल्या. अखेर राहुल चाहने १४ चेंडूत २२ धावांची खेळी करत पंजाबला १८९ धावांपर्यंत पोहचवले.
दोन चेंडू दोन षटकार मारत राहुल तेवतियाने गेलेला सामना परत आणला. अखेरच्या चेंडूपर्यंत रोमांचक झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जचा ६ विकेट्सनी पराभव केला. राहुल तेवतियाने शेवटच्या चेंडूवर षटकार मरात सामना जिंकून दिला.