राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: विदर्भात वर्षभरात 2100 संघ शाखांचे उद्दिष्ट


नागपूर2 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आगामी वर्षभरात विदर्भ प्रांतात संघाच्या शाखांची संख्या २१०० पर्यंत नेणार आहे. कार्य विस्ताराचा हा क्रम असाच सुरू राहिल्यास २०२५ पर्यंत विदर्भात सुमारे ३ हजार संघ शाखा होतील, अशी माहिती संघाचे पश्चिम क्षेत्र (महाराष्ट्र आणि गोवा) सदस्य दीपक तामशेट्टीवार यांनी दिली.

Advertisement

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा १२ ते १४ मार्च दरम्यान हरयाणातील पाणीपत जिल्ह्यात झाली. यात सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वदेशी आचरण आणि नागरिक कर्तव्य यांचा समावेश आहे. समाजातील लोकांना सोबत घेऊन देशातील इतर भागांप्रमाणेच विदर्भातही या ५ आयामांवर काम करणार असल्याचे तामशेट्टीवार यांनी सांगितले. संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी आगामी काळात देशातील एक लाख ठिकाणी संघ शाखांचा विस्तार नेण्यात येईल, असे सांगितले होते. वर्तमानात विदर्भातील १२६९ मंडळात संघाच्या सुमारे १८०० शाखा सुरू आहेत.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement