‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अन् मराठीचा अभ्यासक्रम’: प्राध्यापक परिषदेच्या चर्चासत्रात मंथन; मराठी विभागाच्या वतीने आयोजन

‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अन् मराठीचा अभ्यासक्रम’: प्राध्यापक परिषदेच्या चर्चासत्रात मंथन; मराठी विभागाच्या वतीने आयोजन


अमरावती37 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

नव्याने तयार करण्यात आलेले ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि मराठीचा अभ्यासक्रम’ याविषयावर अमरावती येथील श्री. शिवाजी कला-वाणिज्य महाविद्यालयात सविस्तर चर्चा करण्यात आली. या मंथनातून अनेक बारकावे समोर आले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मराठी प्राध्यापक परिषद आणि श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि मराठीचा अभ्यासक्रम’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र घेण्यात आले.

Advertisement

या चर्चासत्रादरम्यान मराठीचा अभ्यासक्रम केंद्रस्थानी ठेऊन अनेक बाबींवर चर्चा करण्यात आली. सोबतच प्रस्तावित मराठी भाषा विद्यापीठाचे एकंदर स्वरुप कसे असावे, याबाबतही चर्चा करण्यात येऊन मराठी प्राध्यापक परिषदेच्यावतीने या संदर्भातील भूमिका शासनाला कळविण्याचा निर्णय घेण्यात आला. श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे होते. तर मराठी प्राध्यापक परिषदेचे अध्यक्ष डॉ. पवन मांडवकर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मानव्यविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे, विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. काशिनाथ बऱ्हाटे प्रामुख्याने उपस्थित होते.

बी.ए. द्वितीय वर्षाला असलेल्या ‘शब्दगंध’ भाग-२ चे यावेळी प्रकाशनही करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन डॉ. राजेश मिरगे यांनी केले. स्वागतपर भाषण महाविद्यालयाच्या पदव्युत्तर मराठी विभागप्रमुख डॉ. वर्षा चिखले यांनी केले. प्रास्ताविक परिषदेचे सचिव डॉ. अतुल सारडे यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत डॉ. अलका गायकवाड, प्राचार्य डॉ. शोभा रोकडे, डॉ. राजेंद्र हावरे यांनी केले. डॉ. गणेश मालटे यांनी आभार मानले.

Advertisement

डॉ. काशिनाथ बऱ्हाटे यांच्या अध्यक्षतेखालील दुसऱ्या सत्रात डॉ. मोना चिमोटे, डॉ. गजानन मुंदे, डॉ. अण्णा वैद्य, डॉ. श्रीकृष्ण काकडे, डॉ. विजय जाधव यांनी विचार मांडले. तर ‘श्री क्षेत्र रिद्धपूर येथील प्रस्तावित मराठी भाषा विद्यापीठामध्ये अमरावती विद्यापीठीय मराठी प्राध्यापकांची भूमिका’ या विषयावर ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. मनोज तायडे यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे समारोपीय सत्र घेण्यात आले. यावेळी विविध प्राध्यापकांनी आपली भूमिका मांडली. चर्चासत्राला अमरावती विद्यापीठांतर्गत येणारे मराठी विषयाचे प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. भिसे, डॉ. बऱ्हाटे यांचा सत्कार

Advertisement

श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा ‘उत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्धल प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांचा तर विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष झाल्याबद्धल डॉ. काशिनाथ बऱ्हाटे यांचा यावेळी परिषदेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला.



Source link

Advertisement