राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धा: 3 स्पर्धेकांना विजेतेपद; एकूण 150 खेळाडूंनी नोंदवला सहभाग


औरंगाबाद7 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली आयोजित ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात अव्वल मानांकित कर्नाटकच्या आराध्य क्षितिज व मुलींमध्ये तमिळनाडूच्या माया राजेश्वरन यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत एकेरीचे विजेतेपद पटकावले. एन्ड्युरन्स-एमएसएलटीए टेनिस सेंटर विभागीय क्रीडा संकुल औरंगाबाद येथे पार पडलेल्या या स्पर्धेत 150 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.

Advertisement

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व 200 एआयटीए गुण, तर उपविजेत्या खेळाडूंना करंडक व 150 एआयटीए गुण अशी पारितोषिके आणि आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. स्पर्धेचे पारितोषिक वितरण कमांडिंग ऑफिसर कर्नल किशोर भागवत (मराठा लाइट इन्फंट्री) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एआयटीए सुपरवायझर वैशाली शेकटकर, एन्ड्युरन्स ग्रुपचे जीएम संजय दत्ता, केंद्र प्रमुख आशुतोष मिश्रा, मुख्य प्रशिक्षक प्रविण प्रसाद, प्रविण गायसमुद्रे, गजेंद्र भोसले, शंकर लबाडे, राधेशाम अटपले, डॉ. अश्विनी जैसवाल आदींची उपस्थिती होती.

मुलांच्या गटात विजेतेपदासाठीच्या लढतीत कर्नाटक अव्वल मानांकित आराध्य क्षितिजने तेलंगणाच्या चौथ्या मानांकित शौर्या समालाचा सलग दोन सेटमध्ये पराभव केला. आराध्यने पहिला सेट 6-2 ने आपल्या नावे केला. दुसऱ्या सेटमध्ये शौर्यने संघर्ष करण्याचा प्रयत्न केला, तरी त्याला यश आले नाही. आराध्यने 6-4 ने सेटसह विजेतेपद आपल्या नावे केले. दुसरीकडे, मुलींच्या गटात अंतिम लढतीत तमिळनाडूच्या अव्वल मानांकित माया राजेश्वरनने आपल्या राज्याची सहकारी दुसऱ्या मानांकित हरिताश्री व्यंकटेशचा 7-6 (1), 6-0 असा संघर्षपुर्ण लढतीत पराभव करत जेतेपद पटकावले.

Advertisement

दुहेरी गटात अंतिम फेरीत मुलांच्या गटात तिसरी मानांकित जोडी महाराष्ट्राच्या वेदांत भसीनने तेलंगणाच्या शौर्य समलाच्या साथीत कर्नाटकच्या शौर्य कल्लंबेला व एम दिगंथ यांचा सलग दाेन सेटमध्ये 6-4, 6-1 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. मुलींच्या फायनलमध्ये तमिळनाडूच्या हरिताश्री व्यंकटेश व दिया रमेश या अव्वल मानांकित जोडीने तमिळनाडूच्या माया राजेश्वरन व हरयाणाच्या स्निग्धा रुहिल या चौथ्या मानांकित जोडीचा 6-1, 6-4 असा पराभव करत दुहेरीचे अजिंक्यपद आपल्या नावे केले.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement