राष्ट्रवादीच्या गडाला भाजपचा धक्का: अहमदनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी शिवाजी कर्डिले विजयी; विखे पॅटर्नवर शिक्कामोर्तब


अहमदनगर9 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

राज्यातील अग्रगण्य असणाऱ्या अहमदनगरच्या जिल्हा सहकारी बँकेत अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले विजयी झाले आहेत. कर्डिले यांना दहा मते तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना नऊ मते मिळाली. जिल्हा बँकेच्या निवडीमध्ये विखे-पिता पुत्राची खेळी यशस्वी झाली.. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.

Advertisement

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष उदय शेळके (46) यांचे निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी बुधवारी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी खासदार डॉ. सुजय विखे, भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्यासह बाजार समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

अध्यक्षपदाची चुरस

Advertisement

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जिल्हा बँकेच्या 20 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा उपनिबंधक (सहकार) गणेश पुरी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काम पाहिले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात भाजपकडून माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले तर राष्ट्रवादी कडून माजी आमदार चंद्रशेखर घुले होते. या मतदानात माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना दहा मते मिळाली तर चंद्रशेखर घुले यांना 9 मते मिळाली. तर एक मत बाद ठरवण्यात आले.

अन् बाजी पलटली

Advertisement

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अहमदनगर मध्ये बैठक घेऊन चर्चा केली होती. अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे यावे यासाठी राष्ट्रवादीने जोरदार मोर्चेबांधणी केली असतानाच अचानक अध्यक्षपद आपल्याकडे घेण्यात भाजपने बाजी मारली. विखेंच्या गटाचे म्हणून ओळखले जाणारे कर्डिले यांना सर्वाधिक दहा मते मिळाल्याने विजयी म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement