राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाला कदमांचे बळ?: आठ वर्षांनी तरुंगाबाहेर, मोहोळ मतदारसंघाची समीकरणे बदलण्यासाठी नव्या हालचाली

राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाला कदमांचे बळ?: आठ वर्षांनी तरुंगाबाहेर, मोहोळ मतदारसंघाची समीकरणे बदलण्यासाठी नव्या हालचाली


भारत नाईक | मोहोळएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम हे रविवारी जामीनवर बाहेर आले. एकीकडे त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला तर दुसरीकडे मोहोळ तालुक्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची मांडणी सुरू झाली आहे. कदम यांनी मी खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांची भेट घेणार असल्याचे जरी प्रसारमाध्यमांना सांगितले असले तरी, प्रत्यक्षात मात्र ते कोणत्या पक्षात राहून पुन्हा मोहोळ विधानसभा मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रित करतील? हा प्रश्न सध्या तरी गुलदस्त्यात आहे. त्यांच्या निर्णयामुळे मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात नक्कीच बदल होईल.

Advertisement

सन २०१४ मध्ये मोहोळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम यांनी भाजपचे क्षीरसागर व शिवसेनेचे शेजवाल यांचा पराभव करत बाजी मारली. या मिळालेल्या संधीचा फायदा उचलत रमेश कदम यांनी मतदारसंघात स्वतंत्र यंत्रणा राबवत ८ महिन्यांच्या कार्यकाळात थेट नागरिकांच्या समस्यांना हात घालत मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ता अशा योजना सुरू केल्यामुळे ते जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर चर्चेत आले. त्याच दरम्यान १८ ऑगस्ट २०१५ रोजी रमेश कदम यांना अण्णाभाऊ साठे महामंडळातील गैरव्यवहाराप्रकरणी अटक करण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी माजी आमदार कदम यांना सोलापूर न्यायालयात आणले असता, दादा गटाचे उमेश पाटील यांनी तासभर चर्चा केली होती. त्यानंतर शरद पवार गटाचे रमेश बारसकर यांनी कदम हेच शरद पवार गटाचे मोहोळचे उमेदवार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते.

मोहोळ विधानसभा मतदारसंघात माजी आमदार राजन पाटील, विद्यमान आमदार माने, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील हे दिग्गज मंडळी दादा गटात आहेत. तर ज्येष्ठ बळीराम काका साठे, रमेश बारसकर ही मंडळी शरद पवार गटात आहेत. अजित दादा गटातही दोन गट आहेत. महाआघाडीत कदम आले तर मुख्यमंत्री शिंदे गटाच्या शिवसेनेचे नागनाथ क्षीरसागर, नागेश वनकळसे, भाजपाचे संजय क्षीरसागर, सुशील क्षीरसागर, दीपक गवळी हे काय भूमिका घेणार? अशा अनेक राजकीय प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळात मोहोळ विधानसभा मतदारसंघातील मतदारांना नक्कीच मिळतील.

Advertisement

उमेश पाटलांनी न्यायालयात जाऊन घेतली होती भेट

२०१९ निवडणुकीत घेतली २३ हजार मते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने यशवंत माने यांना संधी दिली. तरुंगात असलेले रमेश कदम यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. कोणतीही प्रचाराची यंत्रणा नसताना, त्यांनी केलेल्या ८ महिन्यांच्या कामावर त्यात त्यांना २३ हजार ६४९ एवढी मते मिळाले.

Advertisement

८ वर्षाच्या कार्यकाळामध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय दृष्ट्या अनेक बदल झाले असले तरीही माजी आमदार रमेश कदम यांच्या कार्यपद्धतीबद्दल लोकांमध्ये तितकीच उत्सुकता आहे. त्यामुळे रमेश कदम कोणत्या गटाच्या, पक्षाच्या माध्यमातून पुन्हा एकदा २०२४ ला मोहोळ विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, की अपक्ष उमेदवारीची ढाल पाठीला बांधणार ?अशा वेगवेगळ्या चर्चांनी मोहोळ, उत्तर सोलापूर व पंढरपूर तालुक्यातील मतदारांमध्ये चर्चांचे गुऱ्हाळ सुरू असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये माजी आमदार रमेश कदम हे कोणत्या गटात जातात याचे चित्र स्पष्ट होईल.Source link

Advertisement