मुंबई35 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
राष्ट्रवादी काँग्रेसचे फायर ब्रँड नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे समजते. त्यांच्यावर चौथ्यांदा तब्बल 450 पानी आरोपत्र दाखल करण्यात आले आहे.
ठाण्यातील अनंत करमुसे मारहाण प्रकरण त्यांच्यावर शेकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणी त्यांच्यावर ठाणे पोलिसांनी तिसरे पुरवणी आरोपत्र दाखल केल्याचे समजते.
नेमके प्रकरण काय?
ठाण्यातल्या आनंदनगर भागातल्या अनंत करमुसे या सिव्हील इंजिनिअरने जितेंद्र आव्हाडांविरोधात एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यात आव्हाडांचा आक्षेपार्ह फोटो होता. या प्रकरणी 5 एप्रिल 2020 रोजी आव्हाड समर्थकांनी करमुसेंना नाथ बंगल्यावर नेले. तिथे मारहाण केली. यावेळी जितेंद्र आव्हाड उपस्थित होते, असा आरोप होता.
मारहाणीचे फोटो व्हायरल
अनंत करमुसे रहाणीचे फोटोही नंतर व्हायरल झाले होते. त्यामुळे भाजप पदाधिकारी आक्रमक झाले. त्यांनी आव्हाडांना धारेवर धरले. या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी एक पत्रकार परिषद घेत आपली भूमिकाही मांडली होती. हे प्रकरण सध्या थंड बस्त्यात गेले होते. मात्र, या पुरवणी आरोपत्राने आता पुन्हा ते चर्चेत आले आहे.
भाजप आमदारांची तक्रार
अनंत करमुसे मारहाण प्रकरणी भाजप ठाण्याचे भाजप आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांनी ठाणे पोलिसांकडे धाव घेतली. तत्कालीन पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे घटनेची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर या प्रकरणी वर्तनगर पोलिस ठाण्यात जवळपास वीस जणांवार गुन्हा दाखल झाला.
आता काय झाले?
वर्तनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचे दोन अंगरक्षक आणि इतर अकरा जणांना पोलिसांनी अटक केली. मात्र, नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. आता या प्रकरणी ठाणे पोलिसांनी तिसरे पुरवणी आरोपत्र दाखल केल्याचे समजते. त्यात अनंत करमुसे मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड सूत्रधार होते, असा ठपका ठेवल्याचे समजते. त्यामुळे आव्हाडांच्या अडचणी वाढल्यात.
इतर बातम्याः
उद्धव ठाकरे – एकनाथ शिंदे यांचे मनोमिलन होणार; उपराजधानीतल्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर; पण शंभूराज देसाई म्हणतात लवकरच होणार!
ईडी चौकशीनंतर अजित पवारांचा फोन नाही; जयंत पाटील यांची प्रतिक्रिया, नाराजीच्या चर्चेने धरला जोर!
2024ला ईडी कार्यालयात कोणा-कोणाला पाठवायचे, याची यादी लवकरच जाहीर करू- संजय राऊत
मुंबईत बॉम्बस्फोट घडवणार, पोलिसांना ट्विटरवरून धमकी; सलग दुसऱ्या इशाराने खळबळ