‘रात्री’ची खलबतं: देवेंद्र फडणवीस रातोरात दिल्लीला गेले अन् आले, संपर्क कार्यालयाचे कानावर हात; मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याचा दावा


नागपूरएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या नाट्यमय घडामोडींनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरा केल्याचा दावा एका मराठी वृत्तवाहिनीने केला आहे. या दौऱ्यामुळे शिंदे सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. दरम्यान, फडणवीस दिल्लीला जाऊन आल्याची माहिती त्यांच्या नागपूर कार्यालयाने फेटाळली आहे.

Advertisement

दिल्लीत पुन्हा रात्रीची खलबते?

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल नुकताच दिला. यामुळे शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. या विस्ताराकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष आहे. एवढेच नाही तर शिवसेना व भाजपच्या अनेक नेत्यांनाही या विस्ताराची उत्सुकता लागली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी हा दिल्ली दौरा केला आहे.

Advertisement

यासंबंधीच्या वृत्तानुसार, नागपूर दौऱ्यानंतर देवेंद्र फडणवीस अवघ्या काही तासांसाठी राजधानी दिल्लीला जाऊन मध्यरात्री पुन्हा नागपुरात परतले. या दौऱ्यात त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. दुसरीकडे, शुक्रवारचा नागपूर दौरा संपवून फडणवीस तातडीने दिल्लीला गेल्याची वार्ता त्यांच्या नागपूर कार्यालयाने फेटाळली आहे. यामुळे याविषयी तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत.

मंत्रिमंडळ विस्तार कधी?

Advertisement

सत्तासंघर्षाच्या निकालानंतर शिंदे फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. शिंदे गटातले अनेक माजी मंत्री पुन्हा संधी न मिळाल्याने नाराज आहेत. अनेकजण सातत्याने आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवत असतात. तूर्त, राज्याच्या मंत्रिमंडळात 20 मंत्री आहेत. यात शिंदे व भाजप गटाच्या प्रत्येकी 9 मंत्र्यांचा समावेश आहे.

दिव्य मराठीची खालील बातमी वाचा…

Advertisement

टोला:कधी नोटा काढायच्या कधी बंद करायच्या, राज ठाकरेंनी भाजपला सुनावले खडे बोल; त्र्यंबकेश्वर वादावरुन घेतला समाचार

नोटाबंदी ही धरसोडपणाचा प्रकार होता. तज्ञांना विचारुन केले असते तर ही वेळ आली नसती. कधी नोटा काढायच्या कधी बंद करायच्या, असे सरकार चालते का? असा सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरावरील वादावरुन भाजपला टोला लगावला आहे.

Advertisement

महाराष्ट्रात असे अनेक मंदिर ज्याठिकाणी हजारो वर्षांची परंपरा आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराची 100 वर्षांची परंपरा मोडू नका. याठिकाणी नसते मुद्दे उकरुन काढू नका, असा टोला राज ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. तसेच कर्नाटकमधील भाजपच्या पराभवावर कोणी बोलायचेच नाही का? असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला. येथे वाचा संपूर्ण बातमी…

राजकारण:2024 ला पुन्हा मोदींची सत्ता आली तर BJP ला कुणीच सत्तेतून बेदखल करू शकणार नाही, देवेंद्र फडणवीस यांचा दावा

Advertisement

आगामी सार्वत्रिक निवडणुकांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारचा विजय झाला तर सत्ताधारी भाजपला कुणीही सत्तेतून बेदखल करू शकणार नाही, असा वा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मोदींच्या नेतृत्वात पुढील 5 वर्षांत भारताचा मोठा विकास होणार आहे. कार्यकर्त्यांनी 1 वर्षभर कष्ट घेतले आणि 2024 मध्ये मोदींचे पुन्हा सरकार आले तर त्यानंतर कुणीही भाजपला सत्तेतून बाजूला करू शकणार नाही, असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपूर जिल्हयात दौऱ्याची सुरूवात ही सावनेरमधून करा, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. मला पालकमंत्रीपदाची तुम्ही मला शिकवण द्या असे बावनकुळेंना म्हटल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. राज्यात भाजपचे मजबूत संघटन ते निर्माण करत आहे. नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात भाजपा नागपुरात मजबूत आहे. तितकीच मजबूत ती सावनेर मतदारसंघात आहे. निवणुकीच्या वेळी काही तरी शाप लागतो आणि आपण निवडणुकीत मागे पडतो. सावनेर मतदारसंघात आपली चांगली ताकद आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी…

Advertisement



Source link

Advertisement