राणेंचा आत्मविश्वास शिगेला: सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत विजयानंतर नारायण राणे म्हणाले- आता महाराष्ट्रात सत्ता स्थापनेकडे लक्ष


Advertisement

40 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

सिंधुदुर्गच्या जिल्हा बँक निवडणुकीत आज भारतीय जनता पक्ष पुरस्कृत पॅनलने 19 पैकी 11 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आहे. नितेश राणे यांच्या मेहनतीला यश मिळाले असून, या विजयाचे श्रेय जनता, भाजपचे कार्यकर्ते यांना जाते अशा भावना केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी व्यक्त केल्या आहेत. तसेच या बँकेवर आपली नाही तर भाजपची सत्ता आल्याचे राणेंनी सांगितले.

Advertisement

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर विजय मिळवल्यानंतर आपले लक्ष राज्याकडे असेल असे राणेंनी सांगितले. राज्याला मुख्यमंत्री नसून, राज्य अधोगतीच्या मार्गावर असल्याचेही ते म्हणाले. तसेच राज्याला आता भाजपचा मुख्यमंत्री पाहिजे असल्याचे देखील ते म्हणाले. जिल्हा बँक ही स्थानिक शेतकऱ्यांसाठी असून, त्यांच्यासाठीच काम केले जाईल. असेही ते म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तीन पक्ष एकत्र आले तरी ते जिंकू शकले, ज्यांचे चेहरे सुद्धा पाहावत नाहीत, त्यांना लोक संधी देणार नाही असे नारायण राणे यांनी म्हटले.

ज्यांना अक्कल आहे त्यांच्या ताब्यात जनतेने जिल्हा बँक दिली –
भाजपाची सत्ता आली आहे. माझी नाही. या जिल्ह्यातल्या देवदेवता आणि जनता यांच्या आशीर्वादामुळे ही सत्ता आली आहे. माझे सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्यासोबत नितेश राणेनी घेतलेली मेहनत, त्याला निलेश राणे आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली या सगळ्यांनी दिलेली साथ यामुळे हा विजय मिळाला, असे राणे म्हणाले. विजय मिळवताना अकलेचा वापर झाला, अक्कल ज्यांना आहे, त्यांच्या ताब्यात आमच्या देवदेवतांनी जिल्हा बँक दिली आहे, असे नारायण राणे यावेळी म्हणाले.

Advertisement

दरम्यान, सिंधुदुर्गच्या निवडणुकीनंतर आता राज्यात भाजपची सत्ता आणणार असल्याचे नारायण राणे म्हणाले. राज्यात भाजपची सत्ता हवी आहे, ‘लगान’ची टीम नको असा टोलाही लगावला.

नितेश राणेचा जामीन फेटाळला
संतोष परब हल्ला प्रकरणात भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावरही आरोप झाले. तसेच त्यांचा जामीन अर्जही कोर्टाने फेटाळला आहे, अशा वातावरणात झालेल्या या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनलने बाजी मारली.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement