राणांचे एमआरआय प्रकरण: शिवसेनेच्या तक्रारीनंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल, कुणाला भोवणार फोटोशूट प्रकरण ?


मुंबईएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

शिवसेनेच्या तक्रारीनंतर एमआरआय प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिलावती रुग्णालयाविरोधात शिवसेनेची पोलिसात लेखी तक्रार दिली होती. यानंतर आज अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅमेरा घेवून जायला आणि फोटो काढायला परवानगी देणाऱ्या लिलावती रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेने वांद्रे पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. त्यामुळे रुग्णालयाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Advertisement

नेमके काय आहे प्रकरण?

हनुमान चालिसा पठणच्या वादावरून चर्चेत आलेल्या अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार झाले होते. मात्र उपचाराचे फोटो बाहेर आल्याने शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मनीषा कायंदे आणि अन्य शिवसेना नेत्यांनी सोमवारी (१० मे) लीलावती रुग्णालय प्रशासनाला फैलावर घेतले. एमआरआय स्कॅनची मागणी केली. तसेच रुग्णालयाची पोलिसांत तक्रार करणार असल्याचे सांगितले.

Advertisement

खासदार नवनीत राणा यांचा एमआरआय स्कॅन होत असतानाचा फोटो बाहेर आला होता. त्यावर आक्षेप घेत धातूचे उपकरण एमआरआय स्कॅन कक्षात कसे काय नेले, तिथे फोटो काढायची परवानगी कशी काय दिली गेली, असे प्रश्न शिवसेना नेत्यांनी उपस्थित केले. तसेच नवनीत राणा यांचा एमआरआय स्कॅन रिपोर्ट मिळाल्याशिवाय इथून हलणार नाही, असा पवित्रा शिवसेना नेत्यांनी घेतला.

राणा यांचा खरोखर एमआरआय झाला आहे का, झाला असेल तर एमआरआय करताना फोटो कसा काय काढला गेला, रुग्णालयाचे नियम सर्वांना समान नाहीत का, सेलिब्रिटींना वेगळा न्याय आहे का, असे सवाल शिवसेना नेत्यांनी लीलावती रुग्णालय प्रशासनाला केले.

Advertisement

नवनीत राणा यांनी उपचाराचे फक्त नाटक केले असल्याचे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. ‘स्पाँडिलायटिस असतानाही उशी वापरणे, एमआरआय रूममध्ये कॅमेऱ्याचा वापर करणे या सर्व गोष्टींवरून हे फक्त उपचाराचे नाटक होते,’ असा आरोप पेडणेकर यांनी केला.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement