राज ठाकरे म्हणाले: 600 कोटींत यान चंद्रावर पोहोचले, 15 हजार कोटी खर्चूनही रस्ता कसा झाला नाही? मनसेची ताकद दिसेल

राज ठाकरे म्हणाले: 600 कोटींत यान चंद्रावर पोहोचले, 15 हजार कोटी खर्चूनही रस्ता कसा झाला नाही? मनसेची ताकद दिसेल


रायगड18 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पहिल्यांदा हात जोडून जा ऐकले नाही तर हात सोडून जा हे आपल्या पक्षाचे धोरण आहे, असे म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. ज्या महाराष्ट्राने देशाला रस्ता कसा असावा याचा आदर्श घालून दिला, त्या महाराश्ट्रात हा रस्ता का असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

Advertisement

दरम्यान राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, पदयात्रा काढून शांततेने आपण सरकारला आपली समस्या सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. अत्यंत कमी भावात तुमच्या जमीनी घेत आहे . रस्ता झाला की चांगल्या किंमतीमध्ये या जमीनी विकतील आणि पैसा कमवतील, आणि तुम्ही तसेच राहताल. हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही आपल्या जमीनी व्यापाऱ्यांना विकू नका. तुम्हाला या सर्व लोकांचा राग कसा येत नाही. पुन्हा त्याच लोकांना तुम्ही कसे निवडून देता. किती लोकांच्या यामुळे जीव गेला? 15 ते 17 वर्षांत अडीच हजार लोक अपघातात गेली.

राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, पैसे किती खायचे याला मर्यादा असते. सिमिटंचे रस्ते असताता मला मान्य आहे. मात्र, फेव्हर ब्लॉकचे रस्ते असतात का असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. सरकार कंत्राट काढून केवळ पैसे खात आहे, असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. वर्षांनूवर्षे हे सुरू आहे. महाराष्ट्र हा नेहमी पुढारलेला होता, देशाचे प्रबोधन केले आहे. त्याच महाराष्ट्रात असा रस्ता का असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे.

Advertisement

मनसेची जागर यात्रा

रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेतर्फे रायगडमध्ये आज जागर यात्रा काढण्यात आली आहे. मनसेचे सर्व प्रमुख नेते या यात्रेत सहभागी झाले आहे. आता लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आम्ही ही यात्रा शांततेत काढत आहोत. मात्र, यापुढची यात्रा शांततेत नसणार, असा इशारा मनसे नेते अमित ठाकरे यांनी दिला आहे. तसेच, आमच्यावर काय केसेस करायचे ते करा. जागे व्हा, असेही त्यांनी राज्य सरकारला सुनावले आहे.

Advertisement

आठ टप्प्यात यात्रा

मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात पळस्पे ते मानगाव अशी 16 किलोमीटरची पदयात्रा मनसेतर्फे काढण्यात आली आहे. पळस्पे फाट्यावरून या पदयात्रेला सुरुवात झाली आहे. आठ टप्प्यात मनसे ही पदयात्रा काढत आहे.

Advertisement

अमित ठाकरे म्हणाले, आपण चंद्रावर स्वस्तात पोहोचलो. अवघा 600 कोटींचा खर्च आला. मात्र, जवळपास 15 हजार कोटी खर्च करूनही गेल्या 17 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडलेले आहे. निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. हा आवाज आम्हाला सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे. म्हणून आम्ही जागर यात्रा काढतोय. आज सगळ्यांना दिसेल की मनसेची ताकद किती आहे आणि कशा पद्धतीने आम्ही यात्रा काढतोय. वेगवेगळ्या ठिकाणाहून मनसेचे पदाधिकारी आले आहेत. इथल्या स्थानिक लोकांपर्यंत आम्ही हा मुद्दा पोहोचवणार आहोत.Source link

Advertisement