राज्य सब ज्युनिअर फुटबॉल स्पर्धा: छत्रपती संभाजीनगरच्या संघाची भंडारा संघावर एकतर्फी मात, हर्ष पाटीलचे 3 गोल


औरंगाबाद26 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

श्री विलेपार्ले केळवणी मंडळ व वेस्टर्न इंडियन फुटबॉल असोसिएशन, धुळे जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १५ वर्षाखालील सब ज्युनिअर मुलांच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरूवात झाली. स्पर्धेतील पहिल्या लढतीत छत्रपती संभाजीनगरच्या संघाने शानदार विजयी सलामी दिली. शिरपुर (धुळे) येथे सुरू असलेल्या स्पर्धेत ३३ संघांनी सहभाग नोंदवला असून ६०० पेक्षा अधिक युवा फुटबॉलपटू मैदानात उतरले आहेत.

Advertisement

सहा दिवस चालणाऱ्या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या संघाचा पहिला सामना भंडारा शहर संघाविरुद्ध झाला. सामन्यात सुरुवातीलपासून वर्चस्व राखणाऱ्या छत्रपती संभाजीनगरने ८ – ० गोलने सामना जिंकून विजयी अभियान सुरू केले. लढतीत भंडाराच्या खेळाडूंना चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. मात्र त्यांना यश आले नाही.

हर्ष, रोहित, अब्दुलचे चमकदार प्रदर्शन चमकले

Advertisement

सामन्यात छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूंनी आपल्यातील चुणक दाखवली. संघाच्या डिफेंडरने भंडाराला चेंडू गोल पोस्टपर्यंत घेवून जावू दिला नाही. त्यांना एकही गोल करताना आला नाही. छत्रपती संभाजीनगरकडून हर्ष पाटीलने सर्वाधिक ३ गोल केले. पोरस मिसाळने दोन आणि हर्षवर्धन नंदुरे, रोहित घोडके, अब्दुल रहमान यांनी प्रत्येकी एक-एक गोल करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

या सामन्यात सर्वेश घुगे, अर्फिन खान, पार्थ मोहेकर आणि नुमान खान यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचे लक्ष्य वेधले. संघाचा वेगवान व आक्रमक खेळ आजच्या सामन्याचे वैशिष्ठ ठरले. आता छत्रपती संभाजीनगर संघाचा दुसरा सामना शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता जळगाव जिल्हा संघासोबत होणार आहे.

AdvertisementSource link

Advertisement