राज्य फुटबॉल स्पर्धा: जळगाव संघाला हरवत छत्रपती संभाजीनगरचा संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल, रोहत घोडकेचे दाेन गोल


औरंगाबाद27 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

श्री विलेपार्ले केळवणी मंडळ व वेस्टर्न इंडियन फुटबॉल असोसिएशन, धुळे जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १५ वर्षांखालील सबज्युनियर मुलांच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या संघाने शानदार कामगिरी करत सलग दुसरा विजय मिळवला. शिरपूर (धुळे) येथे सुरू असलेल्या स्पर्धेत संभाजीनगरच्या संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

Advertisement

सहा दिवस चालणाऱ्या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या संघाचा दुसरा सामना जळगाव संघाविरुद्ध झाला. सामन्यात सुरुवातीलपासून वर्चस्व राखणाऱ्या छत्रपती संभाजीनगरने ६-२ गोलने एकतर्फी विजय मिळवला. या लढतीत जळगावच्या खेळाडूंना चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. मात्र त्यांना यश आले नाही. जळगावच्या खेळाडूंना दोन गोल वगळात गोलपोस्ट पर्यंत चेंडू घेऊन जाता आला नाही. आता छत्रपती संभाजीनगरचा उपांत्यपूर्व सामना शनिवारी सकाळी सात वाजता कोल्हापूर संघांशी होणार आहे. कोल्हापूर स्पर्धेतील विजेतेपदाच्या दावेदारापैकी एक मजबूत संघ आहे. त्यांना पराभूत केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा संघ पदकाच्या शर्यतीत पोहोचेल.

हर्ष, शार्दुल, जैदचे गोल :

Advertisement

सामन्यात छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूंनी सलग दुसऱ्या सामन्यात आपले वर्चस्व राखले. संघाने जळगावच्या खेळाडूंना मैदानात रोखण्यात यश मिळवले. महत्वाचे म्हणजे संघाच्या डिफेंडरने आपल्या उत्कृष्ट बचावाने सर्वांचे लक्ष्य वेधले. छत्रपती संभाजीनगरकडून रोहित घोडकेने २ आणि हर्ष पाटील, शार्दुल जमधडे, जैद शेख व शेख नोमान यांनी प्रत्येेकी एक-एक गोल करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याचबरोबर पार्थ मोहेकर, नुमान खान यांनी चांगला खेळ केला. आता कोल्हापूरचा सामना अतिशय महत्वाचा आहे. हा सामना गमावल्यास संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येवू शकते.



Source link

Advertisement