राज्य खो-खो स्पर्धा: पश्चिम रेल्वेचा विहंग मंडळावर थरारक विजय; उस्मानाबादच्या छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळाचा पराभव


औरंगाबादएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

परळच्या विद्यार्थी क्रीडा केंद्रातर्फे आयोजित माजी खासदार स्व. मोहन रावले स्मृती चषक निमंत्रितांच्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत पुरुष गटात उपांत्य पूर्व फेरीच्या थरारक लढतीत बलाढ्य पश्चिम रेल्वेने ठाण्याच्या विहंग क्रीडा मंडळाचा अखेर लघुत्तम आक्रमणात पराभव करून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. आता उपांत्य फेरीत पश्चिम रेल्वेचा मुकाबला मुंबई उपनगरच्या महात्मा गांधी संघाशी होईल. तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना पुण्याचा नव महाराष्ट्र संघ आणि मध्य रेल्वे यांच्यात रंगेल. तसेच उस्मानाबादच्या छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळाचा संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

Advertisement

स्पर्धेत पश्चिम रेल्वे विरूद्ध विहंग यांच्यातील पहिल्या डावात पश्चिम रेल्वेने 5-4 अशी 1 गुणाचा आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात रेल्वेचे 5 आणि विहंगचे 6 गुण झाल्यामुळे दोन्ही संघांची 10-10 गुणांची बरोबरी झाली. त्यामुळे सामना पुढे अलहिदा डावात खेळवण्यात आला. त्यात देखील दोन्ही संघांचे 6-6 असे समान गुण झाले. मग ही बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी लघुत्तम आक्रमणाच्या नियमाचा वापर सामन्यात करण्यात आला. त्यामध्ये अखेर पश्चिम रेल्वे संघाने बाजी मारली. रेल्वेच्या दिपक माधवने 1मिनिट 7.10 सेकंदाचा पळतीचा खेळ करून रेल्वेला चांगली सुरुवात करून दिली. विहंगच्या आकाश तोगरेला 1 मिनिट 5.75 सेकंदाचा पळतीचा खेळ करता आला. त्याला प्रसाद राडियेने अखेर बाद करून रेल्वेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या अटीतटीच्या लढतीत रेल्वेकडून महेश शिंदे, दिपक माधव, मनोज पगार, मजहर जमादार यांनी शानदार खेळ केला. तर विहंगतर्फे आकाश तोगडे, लक्ष्मण गवस, आदित्य कांबळे, आकाश साळवे यांनी देखील आपल्या सुरेख खेळाची झलक दाखवली.

आदित्य, मिलिंद, स्वप्निलचे चमकदार कामगिरी

Advertisement

दुसऱ्या सामन्यात पुण्याच्या नव महाराष्ट्र संघाने उस्मानाबादच्या छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळाचा साडेसात मिनिटे राखून आणि २ गुणांनी आरामात पराभव केला. आदित्य गणपुले, मिलिंद कुरपे, स्वप्निल पाटणकर, शिवराम शिंगाडे यांनी संघाला विजयी केले. पराभूत संघाचे अनिकेत पवार, विजय शिंदे चमकले. शिर्सेकर महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमीने मुंबई पोलिसांना 18-11 गुणांनी सहज पराभूत करून उपांत्य फेरीत मजल मारली. मकार सोनावणे, निहार दुबळे, अनिकेत पोटे, ऋषिकेश मुर्चावडे महात्मा गांधींच्या विजयाचे शिल्पकार ठरले. पराभूत संघाच्या अक्षय खापरे, विशाल गायकवाड, अमोल जाधवची झुंज एकाएकी ठरली.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement