- Marathi News
- Local
- Maharashtra
- Nashik
- Due To The Increase In Minimum Temperature In The State, Due To The Increase In The Intensity Of Summer, The Citizens Have To Bear The Heat Of The Sun
नाशिक7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
गत चार दिवसापुर्वी लेह आणि गुलमर्ग येथे किमान तापमान हे उणे 10 अंशापर्यंत गेले होते, मात्र पश्चिमी चक्रावातामुळे वातावरणावर परिणाम झाल्याने या ठिकाणी ढगाळ वातावरण झाले असुन सध्या किमान तापमान हे उणे पाच ते चार अंश सेल्सीअसपर्यंत आले आहे. तसेच महाराष्ट्रात स्वच्छ आणि निरभ्र आकाश असल्याने उन्हाची तीव्रता वाढल्याने किमान तापमानात वाढ होवून थंडी गायब झाली आहे. सुमारे पुढील पाच दिवस राज्यातील थंडी ही कमी प्रमाणात जाणवणार आहे. तर शनिवारी विदर्भात आणि मराठवाड्यात औरंगाबाद वगळता अन्य ठिकाणीही किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी प्रमाणात जाणवली. उत्तर महाराष्ट्रातील निफाड, धुळे, नाशित, जळगाव येथेही किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीचे प्रमाण कमी होते.
अफगाणीस्थानमधून येणाऱ्या पश्चिमी चक्रावातामुळे उत्तर भारतातील वातावरणावर परिणाम होत आहे. 23 जानेवारी दरम्यान हिमालयात पश्चिमी चक्रावात दाखल होण्याची शक्यता असल्याने उत्तर भारतातील थंडीची लाट कमी झाली आहे. तसेच उत्तरेकडुन येणाऱ्या गार वाऱ्याचा वेग हा मंदावला असल्याने वातावरणातील गारवा कमी झाला आहे. सध्या राज्यात प्रत्यावर्ती वाऱ्यामुळे उत्तरेकडुन येणाऱ्या थंडीला विरोध होत आहे. परंतू आगामी आठ दिवसांनतर किमान तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे. विदर्भात शनिवारी नाही जिल्हांमध्ये किमान तापमान हे 15 अंश सेल्सिअसच्या अधिक नोंदविले गेले आहे. शनिवारी सकाळी 10 वाजेनंतर उन्हाची तीव्रता वाढल्या असल्याने नागरिकांना उन्हाचा चटका सहन करावा लागला.
असे होते राज्यातील किमान तापमान
निफाड 9.5, धुळे 10.0, औरंगाबाद 10.7, नाशिक 11.6, जळगाव 12.0, बारामती 12.3,पुणे 12.9, सातारा 13.4,महाबळेश्वर 13.7, सांगली 14.3, परभणी 15.1, सांताक्रुज 17.6,