- Marathi News
- Local
- Maharashtra
- The State’s Biggest Robber, Khichdi Chor On A Tour Of Jalgaon; MLA Nitesh Rane’s Venomous Criticism Of The Thackeray Group
मुंबई8 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
महाराष्ट्रातला सर्वात मोठा दरोडेखोर, त्याच्याबरोबर खिचडीचोर आणि खंबाटा कामगारांना देशोधडीला लावणारा चोर हे सगळे चोर आणि दरोडेखोर आज एकत्र जळगावच्या दौर्यावर आहेत आणि तिथे शासनाच्या आदेशांच्या विरुद्ध शेंबड्या मुलांसारखे नाक रगडायला जाणार आहेत, अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी केली आहे.
दरम्यान नीतेश राणे म्हणाले की, ज्या शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण अधिकृतपणे राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी करावे तिथे हे शेंबड्या मुलांसारखे ‘आम्ही आम्ही’ करायला तिथे जाणार आहेत. उद्धव ठाकरे आणि टोळीला दुसर्यांच्या बारशामध्ये जाऊन स्वतःची नावं लावण्याची पहिल्यापासून सवय आहे. त्यांचे स्वतःचे कार्यक्रम संपलेले आहेत, त्यामुळे दुसर्यांच्या घरात काय चालले यावरच यांचे कार्यक्रम ठरतात.
अन् गृहमंत्र्यांच्या नावाने बोंबलत बसायचे
नीतेश राणे म्हणाले की,राज्याचा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला प्रशासन आणि प्रोटोकॉल्स कळत नाही का? असा खडा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. कायदा आणि सुव्यवस्थेत स्वतः बिघाड करायचा आणि मग उगाच गृहमंत्र्यांच्या नावाने बोंबलत बसायचे, हेच या टोळीचे काम आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
नौटंकीवाल्यांना जनता ओळखते
नीतेश राणे म्हणाले की, मुख्यमंत्री होते त्यावेळेस शेतकर्यांकडे पाहिले देखील नाही आणि त्यादिवशी शेतकर्यांच्या बांधावर गेले. यांनी फक्त गळ्यात पट्टा लावून लोकांची सहानुभूती मिळवली. त्यादिवशी देखील पावसात भिजले होते, आता हे खरंच पावसात भिजलेले की बाजूना जाऊन संजय राऊतने यांच्यावर बिसलेरी ओतली होती, हे अजूनपर्यंत कळलेले नाही. या नौटंकीवाल्यांना महाराष्ट्राची जनता चांगलीच ओळखते, असा टोलाही राणेंनी लगावला आहे.