राज्यभरात प्राध्यापकांनी घेतला बदली विरोधात मँटकडे धाव: घाटीत प्राध्यापकांच्या बदल्यावरुन पाच जणांना  मँटकडून ताप्तुरती स्थगिती

राज्यभरात प्राध्यापकांनी घेतला बदली विरोधात मँटकडे धाव: घाटीत प्राध्यापकांच्या बदल्यावरुन पाच जणांना  मँटकडून ताप्तुरती स्थगिती


छत्रपती संभाजीनगर5 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक
  • ऑगस्टमध्ये बदली केल्यामुळे प्राध्यापकांची नाराजी

महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने प्राध्यापकांच्या बदल्या केल्या होत्या.राज्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल्या केल्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागात खळबळ माजली होती.घाटीतल्या पाच प्राध्यापकांनी या बदल्याच्या विरोधात मँटमध्ये धाव घेतली आहे.तर प्रसुती विभागाच्या विभागप्रमुखांची बदली यवतमाळमध्ये केली.मात्र तिथे ती जागाच रिक्त झाली नसल्यामुळे घाटीच्या प्रसुतीविभागाच्या बाबतही अधिष्ठातांनी शासनाला कळवले आहे.

Advertisement

घाटीत डॉक्टरांच्या बदल्यामुळे प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या आहेत.जूनमध्ये या बदल्या होणे अपेक्षित असताना ऑगस्टमध्ये प्राध्यापकांच्या केलेल्या बदल्यामुळे प्राध्यापकामध्ये नाराजी आहेत. त्यामुळे काही जण मँटमध्ये गेले आहेत. यामध्ये प्राध्यापकांना चार सप्टेबर पर्यत स्थगिती दिली आहे.यामध्ये शासनाच्या वतीने त्यांचे म्हणणे मांडण्यात येणार आहे.

राज्यभरात बहुतांश वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक या बदलीमुळे नाराज आहेत.यामध्ये आणखी प्राध्यापक mat मध्ये जाणार आहेत.त्यामुळे प्रशासना समोर अडचणी वाढल्या आहेत.सचिवांनी अधिष्ठाताकडून मागवला अहवालमहाराष्ट्रात सर्वच वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापकांनी मँटमध्ये धाव घेतल्यामुळे वैद्यकीय सचिवांनी याबाबतचा अहवाल मागितला आहे. सर्वच वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना याबाबतची माहिती मागवण्यात आली आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागााच्या बदल्या वादात सापडल्या आहेत.

Advertisement

राज्यात दरवर्षी विनंंती बदल्याच्या माध्यमातून 30 बदल्या वैद्यकीय शिक्षण विभागात होत असतात. मात्र प्राध्यापकांच्या इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या बदल्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागात खळबळ माजली आहे.यामध्ये अनेक वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या डॉक्टरांना देखील धक्का बसला आहे. त्यामुळे रुग्णव्यवस्थेवर देखील त्याचा परिणाम जाणवण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.Source link

Advertisement