पुणे18 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
गेल्या महिन्यापासून दडी मारल्यानंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाली होती. मात्र, आता पुन्हा पावसाने विश्रांती घेतली आहे. वास्तविक सप्टेंबर महिन्यात हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे राज्यात सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पावसाने महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हजेरी लावली. मात्र, कालपासून पुन्हा पावसाने एकदा विश्रांती घेतली आहे.
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाने दोन ते तीन दिवसांची विश्रांती घेतली आहे. त्या नंतर पुन्हा पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. आज राज्यातील जवळजवळ सर्वच जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
बुधवारपासून जोर वाढणार
पावसाने विश्रांती घेतल्याने सर्वांच्याच चिंता वाढलेली असताना हवामान विभागाने बुधवारपासून जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज राज्यातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. बुधवारपासून पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. बुधवारी आणि गुरुवारी विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.
शेती पिके कोमेजली
राज्यातील अनेक भागात अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे काही भागात पावसाची अद्याप प्रतीक्षा कायम आहे. पावसाअभावी शेती पिके कोमेजली आहेत. तर काही भागात पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. सप्टेंबर महिन्यात राज्याच्या काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.